शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एमआय-17 अपघात : हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे गेला 7 जणांचा जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 22:07 IST

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता.

नवी दिल्ली/श्रीनगर - पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण दक्ष असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हा हल्ला हाणून पाडला होता. मात्र या आणीबाणीच्या परिस्थितीत हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन सहा जवानांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताविषयी धक्कादायक खुलासा झाला असून, एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये असलेल्या हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने  केलेल्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ॉ

हवाई दलातील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार एटीसी टॉवरमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाने सुरुवातीला एमआय-17 चॉपरला तळावर परतण्यास ग्रीन सिग्नल दाखवला होता. मात्र दुसरीकडे एअर डिफेंस युनिटला एअरबेसवर कुठलेही विमान उतरणार नसल्याची सूचना दिली होती. एमआय-17 चॉपर एका मोहिमेवर जात असताना या अधिकाऱ्याने त्याला परत श्रीनगर येथील एअर बेसवर परतण्यास सांगितले होते. तर एअर डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी आपले कुठले विमान किंवा हेलिकॉप्टर  एअर बेसवर येत आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या अधिकाऱ्याने आपले कुठलेही चॉपर किंवा एअरक्राफ्ट बेसवर येत नसल्याचे सांगितले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.  या प्रकरणी याआधी कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण झाली आहे. मात्र ट्रायलला सामोरे जात असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिक साक्षीदारांची तपासणी व्हावी अशी मागणी केल्याने पुन्हा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणी एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्यासह एअर बेसवरील डिफेन्समध्ये तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याचेही कोर्टमार्शल होण्याची शक्यता आहे.   27 फेब्रुवारी श्रीनगरजवळ लष्कराचे एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. पाकिस्तानने एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर देण्याच्या केलेल्या प्रयत्नांदरम्यानच हा अपघात झाला होता.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलJammu Kashmirजम्मू-काश्मीर