शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : एम. जे. अकबर यांची चौकशी झाली पाहिजे; मनेका गांधी यांची जाहीर मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 06:18 IST

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच बोलत नसताना केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी अकबर यांच्या चौकशीची मागणी बुधवारी येथे केली आहे. अशी मागणी करणाऱ्या त्या भाजपमध्ये पहिल्या नेत्या ठरल्या आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच बोलत नसताना केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी अकबर यांच्या चौकशीची मागणी बुधवारी येथे केली आहे. अशी मागणी करणाऱ्या त्या भाजपमध्ये पहिल्या नेत्या ठरल्या आहेत. चौकशी झाली पाहिजे. सत्तेत असलेले लोक नेहमी असे करतात. हे प्रसारमाध्यमांना, राजकारणाला आणि कंपनीत वरिष्ठ पदांवर असलेल्यांनाही लागू होते. आता महिला बोलू लागल्या आहेत म्हणून आम्हीही ते गांभीर्याने घेतले पाहिजे, असे गांधी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाल्या. आपण जाहीरपणे बोललो तर लोक आपली थट्टा उडवून चारित्र्यावर संशय घेतील, अशी भीती महिलांना वाटायची. आता मात्र त्या बोलत आहेत. म्हणून त्यांच्या प्रत्येक आरोपावर आम्ही कारवाई केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. लैंगिक छळ झालेल्या महिलांनी बोलले पाहिजे, असे गांधी यांनी टिष्ट्वटरवर अनेक पोस्टद्वारे म्हटले.पक्षाचा एकही प्रवक्ता यासंदर्भात बोलण्यास तयार नाही. विदेशात असलेले एम. जे. अकबर हे या आरोपासंदर्भात मौन बाळगून आहेत. तथापि, एखाद्या व्यक्तीला पक्षात घेण्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी, असे टिष्ट्वटच्या माध्यमातून पक्षांतर्गतच विरोधी सूर उमटत आहेत. सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले की, राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी संबंधिताच्या वर्तनासंबंधी चौकशी सुरू केली.

टॅग्स :Metoo CampaignमीटूPoliticsराजकारण