ताहाराबाद महाविद्यालयात मेहंदी स्पर्धा उत्साहात
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
ताहाराबाद : येथील महाविद्यालयात वार्षिक स्पर्धेनिमित्त मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. वैयक्तिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सुंदर कलात्मक सौंदर्याचे दर्शन मेहंदी रंग छटेतून दर्शविले. यावेळी स्पर्धेतील ५० विद्यार्थिनींपैकी टीवायबीएची विद्यार्थिनी प्रियंका भामरे हिने स्त्रीभ्रूणहत्त्या व महिलांवरील अत्याचार या विषयावर मेहंदीचे कल्पनात्मक दर्शन घडवून प्रथम क्रमांक पटकावला, तर दुसरा क्रमांक मोहिनी भामरे हिने पटकावला. तृतीय क्रमांक कल्याणी बोरसे हिने मिळविला तर उत्तेजनार्थ बक्षीस राजश्री जगताप हिने मिळविले.
ताहाराबाद महाविद्यालयात मेहंदी स्पर्धा उत्साहात
ताहाराबाद : येथील महाविद्यालयात वार्षिक स्पर्धेनिमित्त मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. वैयक्तिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सुंदर कलात्मक सौंदर्याचे दर्शन मेहंदी रंग छटेतून दर्शविले. यावेळी स्पर्धेतील ५० विद्यार्थिनींपैकी टीवायबीएची विद्यार्थिनी प्रियंका भामरे हिने स्त्रीभ्रूणहत्त्या व महिलांवरील अत्याचार या विषयावर मेहंदीचे कल्पनात्मक दर्शन घडवून प्रथम क्रमांक पटकावला, तर दुसरा क्रमांक मोहिनी भामरे हिने पटकावला. तृतीय क्रमांक कल्याणी बोरसे हिने मिळविला तर उत्तेजनार्थ बक्षीस राजश्री जगताप हिने मिळविले.-----