शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:48 IST

Mehbooba Mufti : १० वर्षांपूर्वीपर्यंत जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या पीडीपीला यंदाच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 

Mehbooba Mufti PDP in Jammu Kashmir Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मोठं यश मिळवलं आहे. तब्बल १० वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा मोठा विजय झाला. दरम्यान, १० वर्षांपूर्वीपर्यंत जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या पीडीपीला यंदाच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 

२०२४ च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाला केवळ ३ जागा मिळाल्या. हाच पक्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून किंग मेकर बनला होता आणि भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं होतं. २०२४ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीला केवळ ८.८७ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत पीडीपीनं कुपवाडा, त्राल आणि पुलवामा या तीन जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, त्रालची जागा अशी होती की पीडीपीचे उमेदवार रफिक अहमद नाईक केवळ ४६० मतांच्या फरकाने विजयी झाले.

मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीचाही पराभवकुपवाड्यातील मीर मोहम्मद फयाज आणि पुलवामा येथील वहीदुर रहमान पारा हे पक्षाची विश्वासार्हता वाचवण्यात हातभार लावू शकतात. इतकंच नाही तर मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी पहिल्यांदाच आपली पारंपारिक जागा बिजबेहारा येथून निवडणूक लढवली. मात्र, पीडीपी ही जागाही वाचवू शकली नाही आणि इल्तिजा मुफ्ती यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर अहमद शाह वीरी यांनी ९७७० मतांनी पराभव केला.

१० वर्षांपूर्वीपर्यंत पीडीपीचं होतं वर्चस्व२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्यावेळी पीडीपीला एकूण २८ जागा मिळाल्या होत्या आणि मतांची टक्केवारी २२.६७ टक्के होती. हे देखील मागील निवडणुकीपेक्षा सात जागा अधिक होत्या. म्हणजे पक्षाचा जनाधार सतत वाढत होता.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीjammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४Jammu Kashmirजम्मू-काश्मीर