शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये कलम '35 अ'च्या मुद्द्यावरच एनडीएशी युती- महेबुबा मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 17:04 IST

जम्मू-काश्मीर आणि तिथल्या नागरिकांना विशेष दर्जा देणारं कलम रद्द करण्याच्या हालचाली सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली

नवी दिल्ली, दि. 11 - जम्मू-काश्मीर आणि तिथल्या नागरिकांना विशेष दर्जा देणारं कलम रद्द करण्याच्या हालचाली सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि राज्यातील स्थानिक नागरिकांना विशेषाधिकार देणारं कलम 35 अ रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना विशेषाधिकार देणारं कलम 35 अ हे रद्द होणार नाही, असं जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 कायम राहील, याच मुद्द्यावर पीडीपीनं भाजपासोबत युती केली आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युतीचा अजेंडा 100 टक्के अबाधित राहील, असं आश्वासन दिल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.    गेल्या काही दिवसापूर्वीच जम्मू-काश्मीरमधले कलम 370 रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका दाखल करून घेतली आहे आणि सर्वोच्च न्यायालय लवकरच या याचिकेवर सुनावणी करणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावून जम्मू-काश्मीरमधल्या कलम 370 संदर्भातील स्वतःची बाजू स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.या याचिकेनुसार संविधान सभा अस्तित्वात असेपर्यंत कलम 370 हे वैध होते. मात्र संविधान सभेला 26 जानेवारी 1957ला विसर्जित करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. जम्मू-काश्मीरमधल्या कलम 370 विरोधात कुमारी विजयलक्ष्मी झा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्या कुमारी विजयलक्ष्मी झा म्हणाल्या, सरकारनं या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. कारण या कलम 370ला भारताचे राष्ट्रपती, संसद आणि केंद्र सरकारनं परवानगी दिली नाहीये. यापूर्वीसुद्धा जम्मू-काश्मीरमधील कलम 370विरोधात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. नेहरुंच्या सांगण्यावरुनच शेख अब्दुल्लांनी कलम 370 घटनेमध्ये अंतर्भूत करण्याचा आग्रह धरल्याचे सांगत ही सुद्धा असहिष्णूताच होती असेही ते म्हणाले.कलम 370 मध्ये काय आहेत तरतुदी?कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असून, हे राज्य विशेष स्वायत्तता राज्य आहे. कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे. इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना जम्मू-काश्मीर सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचा अधिकार नाही. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरमध्ये 1976चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही. याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते कलमही जम्मू-काश्मीरवर लागू होत नाही. भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत. जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे. पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम 370 अस्तित्वात आले. 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे.