शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं करू नका", पंतप्रधान मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 18:55 IST

भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना संबोधित केलं.

नवी दिल्ली-

भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना संबोधित केलं. यात पंतप्रधानांनी भाजपा नेत्यांना मुस्लिम समाजाबाबत विचारपूर्वक विधान करण्याचा सल्ला दिला आहे. "मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं अजिबात करू नका. भारत सध्या सर्वोत्तम काळाचा अनुभव घेत आहे आणि अशात आपण मेहनतीच्याबाबत कुठेच मागे पडता कामा नये. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. विविध ठिकाणी जाऊन लोकांना भेटा. राष्ट्रवादाची ज्योत प्रत्येक ठिकाणी तेवत राहिली पाहिजे", असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाजपा नेत्यांना देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही तयारी करण्यास सांगितलं. "संपूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या तयारीला लागा. मेहनतीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडता कामा नये. भाजपा आता फक्त राजकीय आंदोलन नव्हे, तर सामाजिक आंदोलनात बदललं गेलं पाहिजे. अमृतकाळाचे परिवर्तन कर्तव्यकाळात करायला हवं. आता सामाजिक पातळीवर आपली भूमिका खूप महत्वाची आहे", असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना एक टास्क देखील दिलं आहे. "सीमेलगतच्या गावांमध्ये संघटन आणखी मजबूत करायला हवं. निवडणुकीला अजूनही ४०० दिवस बाकी आहेत आणि आपल्याला पूर्ण ताकदीनं प्रयत्न सुरू करायला हवेत", असं मोदी म्हणाले. 

युवा पीढीपर्यंत संदेश पोहोचला पाहिजे१८ ते २५ वयोगटातील युवांना भारताच्या राजकीय इतिहासाला जवळून पाहिलेलं नाही. याआधीच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांची माहिती त्यांना नाही. यासाठी आपण त्यांना जागरुक करणं आणि भाजपाच्या सुशासनाची माहिती देणं गरजेचं आहे. ज्यापद्धतीनं आपण बेटी बचाओ अभियान यशस्वी केलं त्याचपद्धतीनं आपल्याला आता धरती बचाओ अभियान चालवावं लागणार आहे, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी