धनगर समाज सेवा संघाची बैठक
By admin | Updated: January 12, 2017 02:06 IST
धनगर समाज सेवा संघाची
धनगर समाज सेवा संघाची बैठक
धनगर समाज सेवा संघाची रविवारी वाळपईत बैठकहोंडा : गोवा धनगर समाज सेवा संघ या संस्थेच्या सभासदांची सन 2015- 2016 या सालाची वार्षिक बैठक रविवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वाळपई येथील युनिटी स्कूल हॉलमध्ये घेतली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.या सभेत सन 2015-16 सालचा वार्षिक अहवाल, जमा-खर्च सादर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सत्तरी धनगर समाज बांधवांना भेडसावणार्या समस्यांवर चर्चा केली जाईल. केंद्र सरकारकडे लटकून पडलेल्या अनुसुचीत जमाती विषयीच्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या सभेस 31 मार्च 2016 पर्यंत सभासदत्व स्वीकारलेल्या सभासदांनी उपस्थित राहून समाजाच्या विकासाच्या चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन सचिव पवन वरक यांनी केले आहे. ही सभा आधी वनप्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित केली होती. तथापि रविवारी ती युनिट स्कूलच्या हॉलमध्ये होणार असल्याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)