शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

'एचआर मॅनेजर' ठरला देवदूत! लॉकडाऊनमध्ये गरीबांना केली ५२ लाखांची मदत

By मोरेश्वर येरम | Updated: December 24, 2020 12:06 IST

डोसपती रामू हा एका खासगी कंपनीत 'एचआर मॅनेजर' पदावर कार्यरत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात गरीबांना मदत करणारा देवदूत 'एचआर'गरजूंसाठी चोवीसतास 'Rice ATM'ची संकल्पनागरीबांच्या मदतीसाठी त्यानं पीएफ खातं, डेबिट, क्रेडिट कार्डही रिकामं केलं

हैदराबादगेल्या काही महिन्यांपासून हैदराबादचा ४३ वर्षीय डोसपती रामू हा गरीबांसाठी देवदूत ठरला आहे. डोसपती यानं लॉकडाऊन काळात आतापर्यंत स्वत:च्या पाकिटातून तब्बल ५२ लाख रुपयांची मदत केली आहे. 

डोसपती रामू हा एका खासगी कंपनीत 'एचआर मॅनेजर' पदावर कार्यरत आहे. त्यानं लॉकडाऊनमध्ये गरीबांना मदत करण्यासाठी स्वत:चं पीएफ खातं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं रिकामी केलं. इतकंच नव्हे, तर नालागोंडा येथील जमीन देखील त्यानं विकली. डोसपती यानं त्याची पत्नी आणि दोन मुलांसह मोठ्या फ्लॅटमध्ये जाण्याचं स्वप्न देखील पणाला लावलं आहे. डोसपतीच्या या दानशूरपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

डोसपतीनं नेमकं काय केलं?डोसपती यानं लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी चोवीसतास 'Rice ATM'ची संकल्पना राबवली. या संकल्पनेला १९ डिसेंबर रोजी २५० दिवस पूर्ण झाले आहेत. या माध्यमातून गरीबांना मोफत तांदूळ देण्याचं काम डोसपती यानं केलं आहे. 

"लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजचं जेवण देखील मिळणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे समाजाप्रती काहीतरी करण्याची जाणीव निर्माण झाली आणि यातूनच सारं पुढे घडत गेलं. मला फक्त तांदळाची मदत करायची नव्हती. कारण त्यावेळी गरीबांना औषधं, दूध, भाज्या अशी इतर वस्तूंचीही गरज होती. यासर्व गोष्टी माझ्या क्रेडीट कार्डमधून मिळवणं शक्य नव्हतं. मी माझ्या कंपनीत गेल्या १६ वर्षांपासून काम करत असल्यानं पीएफमधून मला ५ लाख रुपये काढता आले. यातून मी इतर सर्व गोष्टी विकत घेऊ शकलो आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकलो", असं डोसपती अगदी प्रांजळपणे सांगतो. डोसपती याची पत्नी एका शाळेत शिक्षिका असून त्यानं केलेल्या कामाचं श्रेय तो आपल्या पत्नीला देतो. पत्नी माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली म्हणून मी हे करु शकलो, असं तो सांगतो. 

डोसपती रामू याचा त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या पाच महिन्यांपूर्वी दुचाकीवरुन अपघात झाला होता. त्यातून तो बचावला आणि आपल्याला मिळालेल्या नव्या आयुष्यात गरीबांची मदत करण्याचं त्यानं ठरवलं. आपल्या मासिक वेतनामधून एकूण ७० टक्के रक्कम गरजूंच्या मदतीसाठी वापरायची असं त्यानं ठरवलं होतं. 

अपघातातून सावरल्यानंतर त्यानं अनेक जागरुकता मोहीमेतही सहभाग घेऊन हेल्मेट आणि सीटबेल्टचं महत्व पटवून देण्याचे प्रयत्न केले. इतकंच नाही, तर शहरात रहदारीच्या रस्त्यांवर जास्तीत जास्त सीसीटीव्ही बसविण्यासाठीही त्यानं पुढाकार घेतला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या