शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Medicines Price Hike: कळ सोसा! इंधनानंतर आता औषधेही महागणार; पॅरासिटेमॉलसह ८०० मेडिसिनच्या दरवाढीला केंद्राची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 10:08 IST

Essential Medicines Price Hike: ताप, उच्च रक्त दाब, हृदयरोग, त्वचा रोग अॅनिमिया सारख्या आजारांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या औषधांचा समावेश आहे.

वाढती महागाई लवकरच आक्राळविक्राळ रुप घेणार आहे. इंधनाचे दर वाढत चालले असून खाद्यतेल, गॅस, अन्न धान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. असे असताना करोडो लोकांचे आजारपण सुसह्य करणाऱी औषधेही महागणार आहेत. पॅरासिटेमॉलसह ८०० हून अधिक औषधांच्या किंमती येत्या एप्रिलपासून वाढणार असून आता जास्त पैसे खर्च करावे लागमार आहे. (Medicines Price Hike)

औषधांच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामध्ये ताप, उच्च रक्त दाब, हृदयरोग, त्वचा रोग अॅनिमिया सारख्या आजारांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या औषधांचा समावेश आहे. पॅरासिटेमॉल (Paracetamol) सारख्या सर्वाधिक वापराच्या औषधांच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. एप्रिलपासून पेनकिलर आणि अँटी बायोटीक औषधांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. 

या औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. नॅशनल फार्मा प्रायजिंग ऑथरिटीनुसार घाऊक महागाई दराच्या (WPI) आधारावर औषधांच्या किमती वाढवल्या जातील. NPPA ने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे. फार्मा कंपन्या कोविड-19 महामारीपासून औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहेत.

शेड्यूल औषधांमध्ये आवश्यक औषधांचा समावेश होतो. त्यात अशी औषधे आहेत ज्यांच्या किमती फार्मास्युटिकल कंपन्या स्वतः वाढवू शकत नाहीत. या औषधांच्या किमती वाढवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. यामध्ये मध्यम ते गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरत असलेल्या औषधांचाही समावेश आहे.कोरोना विषाणूच्या साथीपासून फार्मा उद्योग शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, एक हजाराहून अधिक भारतीय औषध निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लॉबीने सरकारला सर्व निश्चित फॉर्म्युलेशनच्या किमती 10 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती. याशिवाय शेड्यूल नसलेल्या औषधांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :Inflationमहागाईcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं