शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 20:07 IST

Medha Patkar Convicted: नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर अडचणीत, 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी

Medha Patkar Defamation Case : सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने शुक्रवारी (24 मे) 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. तत्कालीन KVIC चेअरमन व्हीके सक्सेना (आता दिल्लीचे नायब राज्यपाल) यांनी पाटकरांविरोधात याचिका दाखल केली होती.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, साकेत न्यायालयाचे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी पाटकर यांना मानहानीप्रकरणी दोषी ठरवले. कायद्यानुसार त्यांना दोन वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. मेधा पाटकर यांनी स्वतः आणि नर्मदा बचाव आंदोलन विरोधात जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल व्हीके सक्सेना यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पाटकर आणि दिल्लीचे एलजी, 2000 सालापासून ही कायदेशीर लढाई लढत आहेत. 

न्यायालयाने काय म्हटले?मेधा पाटकर यांना दोषी ठरवताना साकेत न्यायालयाने म्हटले की, "तक्रारदारचे भ्याड, देशविरोधी आणि हवाला व्यवहारात सहभागी असल्याचे आरोप केवळ बदनामीकारकच नव्हते, तर ते नकारात्मकता पसरवण्यासाठी तयार करण्यात आले होते."

काय आहे प्रकरण ?हा मानहानीचा खटला 2003 चा आहे. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्हीके सक्सेना, हे त्यावेळी अहमदाबादस्थित एनजीओ नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते. एका टीव्ही चॅनलवर आपल्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करणे आणि बदनामीकारक प्रेस स्टेटमेंट जारी केल्याबद्दल सक्सेना यांनी मेधा पाटकरांविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरdelhiदिल्लीCourtन्यायालय