शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

MCD Election Result : आपचा रडीचा डाव! म्हणे,ईव्हीएममुळे आमचा पराभव

By admin | Updated: April 26, 2017 12:10 IST

दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याऐवजी आम आदमी पार्टीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर पराभवाचे खापर फोडले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 26 - दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याऐवजी आम आदमी पार्टीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर पराभवाचे खापर फोडले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्यामुळे पराभव झाल्याचे आपने म्हटले आहे. दिल्लीत भाजपाने केलेली कामगिरी अविश्वसनीय आहे. भाजपा आणि आपला मिळालेल्या जागांमध्ये मोठी तफावत आहे. भाजपाने ईव्हीएममशीनमध्ये छेडछाड केल्यामुळे त्यांना इतका मोठा विजय मिळवता आला असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी केला आहे. 
 
ज्या भाजपाने  ईव्हीएम मशीन्सच्या छेडछाडीसंबंधी पुस्तके लिहीली, न्यायालयात खटले दाखल केले तीच भाजपा आता ईव्हीएमचे समर्थन करत आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी भविष्यात ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडावे लागेल असे सिसोदीया म्हणाले. दरम्यान आपचे दुसरे नेते गोपाल राय यांनी सुद्धा असाच आरोप केला आहे. ही मोदी लाट नसून इव्हीएम लाट असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोपाल राय यांनी हा आरोप केला. दशकभरापासून दिल्लीचे रस्ते स्वच्छ झालेले नाहीत पण एमसीडीमध्ये भाजपाने क्लीनस्वीप केले. जेव्हा मशीन तुमच्यासोबत असते तेव्हा माणसाचे महत्व नगण्य होऊन जाते असे टि्वट दिल्ली सरकारचे प्रसारमाध्यम सल्लागार नागेंद्र शर्मा यांनी केले आहे. 
 
दिल्ली महापालिकेत एकूण 272 जागा असून, भाजपा 180, काँग्रेस 35, आप 45 आणि अन्य 10 जागांवर आघाडीवर आहेत. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. तिन्ही मनपामध्ये (दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली) भाजपानं बहुमताचा आकडा पार केला आहे.  मतमोजणीचे सुरुवातीचे कल पाहता पहिल्या तासाभरात भाजपानं काँग्रेस आणि "आप"ला बरंच मागे सोडत निर्णायक आघाडी मिळवली.