शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

...अन् स्वप्न अर्धवटच राहिलं; MBBS विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 09:36 IST

१९ मार्चला MBBS च्या अंतिम वर्षाची परीक्षा पूर्ण होणार होती. परंतु त्याआधीच ८ मार्चला अनिताचा कॉलेजमध्ये हार्ट अटॅक आल्याने दुर्देवी मृत्यू झाला.

जोधपूर - शहरात बीजेएस परिसरात राहणाऱ्या MBBS विद्यार्थिनी अनिताचा मिझोरमच्या जोरम मेडिकल कॉलेजमध्ये हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. अनिता नागौर तालनपूरची रहिवासी होती परंतु तिचं कुटुंब सध्या जोधपूरमध्ये वास्तव्यास होते. विशेष म्हणजे गावातील पहिलीच मुलगी अनिताने डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिले होते आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही दिवसच शिल्लक होते. 

१९ मार्चला MBBS च्या अंतिम वर्षाची परीक्षा पूर्ण होणार होती. परंतु त्याआधीच ८ मार्चला अनिताचा कॉलेजमध्ये हार्ट अटॅक आल्याने दुर्देवी मृत्यू झाला. अनिता ही गावातील पहिली महिला डॉक्टर बनणार होती. २०१८ मध्ये NEET मध्ये अनिताचं सिलेक्शन झाले होते. कुटुंबाने सांगितले की, आमची मुलगी मिझारोममध्ये MBBS करण्यासाठी गेली होती. परंतु त्याठिकाणी स्थानिक भाषेसह शिक्षण घेणे तिच्यासाठी खूप कठीण होते. अनिता अंतिम वर्षापर्यंत पोहचली. पण परीक्षा पूर्ण होण्याआधीच ८ मार्चला तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. 

जोधपूरमध्ये इंटर्नशिप करणार होतीमागील काही दिवसांपूर्वी काका उम्मेदसिंहसोबत पुतणी अनिताचं बोलणे झाले होते. तेव्हा अंतिम वर्षाची परीक्षा पूर्ण झाल्यावर ती जोधपूरमध्ये येऊन इंटर्नशिप करणार होती. परंतु ८ मार्चला तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. सर्वात मोठं दु:ख की अनिताच्या जागी तिचा मृतदेह १० मार्चला गावी पोहचला. ११ मार्चला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अनिताचे वडील सोजत इथं पोलीस खात्यात एएसआय पदावर कार्यरत होते. एक भाऊ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घ्यायचा. तर छोटा भाऊ भारतीय वायू सेनेत Indian Air Force कार्यरत आहे. अनितानं तिच्या स्वभावानं कॉलेजमध्ये सर्वांची मने जिंकली होती. त्याच कारणाने ८ मार्चला तिचा मृत्यू झाल्यानंतर कॉलेजमध्ये होणारी ९ मार्चची परीक्षा रद्द करण्यात आली होती.