महापौरपदी नितीन ला विजयी
By admin | Updated: March 11, 2016 00:28 IST
(मुख्य १ साठी)
महापौरपदी नितीन ला विजयी
(मुख्य १ साठी)जळगाव : मनपा महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी खाविआचे नितीन ला तर उपमहापौरपदी मनसेचे ललित कोल्हे विजयी झाले. खाविआ, मनसे, राष्ट्रवादी, जनक्रांती व शिवसेनेने एकत्रितपणे या दोघा उमेदवारांना पाठिंबा दिलेला असतानाही भाजपाने केवळ १५ सदस्य संख्या असूनही माघार न घेतल्याने मतदान झाले. त्यात भाजपाच्या महापौर उपमहापौरपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी १७ मते तर खाविआ व मनसेच्या उमेदवारांना ५८ मते मिळाली. तब्बल ४१ मतांच्या फरकांनी महापौरपदी नितीन ला व उपमहापौरपदी ललित कोल्हे यांची निवड झाली.