शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

काटोलचे नगराध्यक्ष, ११ नगरसेवक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:27 IST

नगर परिषदेतील काँक्रिट रस्ते दुरुस्ती व नाली बांधकामासह २९ कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी

काटोल : नगर परिषदेतील काँक्रिट रस्ते दुरुस्ती व नाली बांधकामासह २९ कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हा आदेश काढला आहे.तत्कालीन नगराध्यक्ष सरला विश्राम उईके, तत्कालीन उपाध्यक्ष तथा विद्यमान नगराध्यक्ष राहुल वीरेंद्र देशमुख, आशा शंकर राऊत, शोभा अशोक जवंजाळ, नलिनी कैलास लारोकर, नानाजी रामजी वंजारी, सुरेश चंपतराव पर्बत, गीता महेश चांडक, राजेश सुखदेव डेहनकर आणि गिरीश धनराज पालीवाल यांचा अपात्र नगरसेवकांमध्ये समावेश आहे. जितेंद्र नेमलालजी तुपकर यांनी २४ जुलै २०१३ मध्ये त्याबाबत तक्रार केली होती. नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २, ३, ४ आणि ५ मधील काँक्रिट रस्ते दुरुस्ती व नाली बांधकाम अशी एकूण २९ कामे २५ हजार ते ४० हजार या मर्यादेत विभागण्यात आली. सदर काम हे नोंदणीकृत व अर्हताप्राप्त असलेल्या कंत्राटदाराला देण्याऐवजी अनुभव नसलेल्या कंत्राटदारास देण्यात आले. शासनाने त्याची दखल घेऊन १९ आॅगस्टला चौकशी अधिकारी नियुक्त केले होते. त्याचा अहवाल ३१ डिसेंबर २०१३ला अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. त्यांनी २५ फेब्रुवारीला नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला. त्याची ९ जून २०१५ मध्ये अंतिम सुनावणी झाली. मात्र उच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी हा आदेश जारी झाला.