शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील, भाजपा खासदाराचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 13:27 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, राजकीय नेतेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, राजकीय नेतेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यादरम्यान केसरगंजचे भाजपा खासदार आणि उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांना उत्तर प्रदेशातली सर्वात मोठी गुंड असल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर मायावती तुरुंगाची हवा खातील, असंही ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मायावतींनी केसरगंजमध्ये महागठबंधनचे बसपाचे उमेदवार चंद्रदेव राम यादव यांच्यासाठी निवडणूक सभा घेतली होती. त्या सभेत मायावतींनी बृजभूषण यांच्यावर टीका केली होती.तसेच बृजभूषण माफिया आणि गुंडा असल्याचं मायावती म्हणाल्या होत्या. त्यावर बृजभूषण यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मायावतींनी गोंडामधल्या एक रॅलीदरम्यान मला गुंडा म्हटलं आहे. मला असं वाटतं की त्या स्वतःच गुंड आहेत. त्यांनी मला निवडणुकीनंतर जेलमध्ये घालण्याची धमकी दिली आहे. परंतु निवडणुकीनंतर त्या स्वतःच जेलमध्ये जातील, असंही बृजभूषण म्हणाले आहेत.

खरं तर मायावतींनी बसपा उमेदवार चंद्रदेव राम यादव यांच्यासाठी निवडणूक रॅलीला संबोधित केलं होतं. या दरम्यान भाजपाचे उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर टीका करताना योगी सरकार आणि मोदी सरकारवही हल्लाबोल केला आहे. नमो नमोचा खेळ आता संपला आहे. त्यामुळे निवडणुकीत मोदींचं नाटक चालणार नाही, असंही मायावती म्हणाल्या आहेत.  

टॅग्स :mayawatiमायावतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक