शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 02:47 IST

मायावती यांचा सवाल : कोरोना, पुरामुळे जनजीवन विस्कळीत

लखनौ : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि बिहारातील नितीशकुमार सरकार यांच्यावर बिहार निवडणुकांच्या निमित्ताने बसपा नेत्या मायावती यांनी जोरदार शरसंधान केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना बिहारातील निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का, असा सवाल मायावती यांनी केला आहे.मायावती यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, बिहारातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लाखो गरीब कुटुंबांची कोरोना महामारी आणि पुरामुळे पूर्ण वाताहत झाली आहे. लोक मेटाकुटीला आले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. तथापि, त्यांना मदत पोहोचविण्याच्या बाबतीत सरकार पूर्णत: उदासीन असल्याचे दिसून येत आहे.मदतीचा अभाव हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. संतप्त झालेले लोक आमदारांना ओलीस धरीत आहेत. परिस्थिती इतकी विकोपाला गेली असली तरीही सरकार उदासीन आणि बेजाबदारच आहे. ही बाब अत्यंत दु:खदायक आणि अमानवी आहे. बिहारात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. कोरोना महामारीची परिस्थितीही राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी केंद्र व राज्य सरकारांवर टीकास्त्र सोडले आहे.सर्वच पातळ्यांवर सरकारची बेशिस्तअन्य एका टष्ट्वीटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे की, बिहार निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या असताना जनतेच्या हिताबाबत तेथील सरकारकडून प्रत्येक पातळीवर बेशिस्तीचे आणि उदासीनतेचे प्रदर्शन केले जात आहे. ही बाब आश्चर्यकारक आहे. अशा वेळी एकच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो की, विधानसभेच्या निवडणुका केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांना वेळेवर घ्यायच्या नाहीत का?

टॅग्स :mayawatiमायावतीBiharबिहार