शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भाजपापासून मायावती बसपाला दूर ठेवतील?

By admin | Updated: February 18, 2017 01:42 IST

बहुमत न मिळाल्यास बहुजन समाज पक्ष विरोधी बाकांवर बसेल, मात्र भाजपाबरोबर सरकार बनवणार नाही. खचलेल्या भाजपाने मुस्लीम समुदाय

सुरेश भटेवरा / लखनऊ (उत्तर प्रदेश)बहुमत न मिळाल्यास बहुजन समाज पक्ष विरोधी बाकांवर बसेल, मात्र भाजपाबरोबर सरकार बनवणार नाही. खचलेल्या भाजपाने मुस्लीम समुदाय बसपापासून दूर राहावा, यासाठी सोशल मीडियाद्वारे खोटा प्रचार चालवला आहे. या अफवांवर अल्पसंख्य समाजाने विश्वास ठेवू नये... हे वक्तव्य आहे मायावतींचे.मैदानावर हजारो समर्थकांची गर्दी होती. सभेसाठी लोक चालत आले होते. एका दिव्यांगाची गर्दीशी झटापट चालली होती. सभा संपताच त्याला विचारले, बहनजींच्या सभेबाबत कशाची उत्सुकता वाटते? तेव्हा तो म्हणाला, ‘मेरे जैसे लाखो लोगोंका नसीब बदलने की क्षमता बहनजी में हैं।’ सभा संपल्यावर लोक शांततेत परतले. त्यांच्या चेहऱ्यांवर विद्रोहाची झलक होती. पंधरा-वीस वर्षांपूर्वी बसपचा निळा झेंडा शहरी झोपडपट्ट्या व ग्रामीण भागातल्या कच्च्या घरांवर दिसायचा. आता पक्क्या घरांवर, खिडक्यांंवर, मुस्लीम मोहल्ल्यांमध्येही तो दिसतो. मोठमोठे होर्डिंग्ज, चमकदार प्रचारसाहित्य आणि मीडियाच्या झगमगाटापासून दूर, बसपचे कार्यकर्ते गल्लोगल्ली बहनजींसाठी मतांचा जोगवा मागतात. अगदी मीडियाच्या सहकार्याविना.ब्राह्मण समाजाने गेल्या निवडणुकीत मायावतींची साथ सोडली. पण बसपामधे जाटवांचे वर्चस्व असल्याने कश्यप, पासी, मौर्य, धोबी, वाल्मिकी नेत्यांना महत्त्व न मिळाल्याने गैरजाटव नेतेही बसपापासून दूर गेले. भाजपाने हे हेरले आणि परंपरागत मतदारांसह दलित व ओबीसींचीही मोट बांधण्याचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी ठरतो, हे निकालानंतर कळेल. समाजवादी पक्षातला कलह शिगेला पोहोचल्यामुळे मुस्लीम समाज संभ्रमात होता. तेव्हा मुस्लीम-दलितांचे समीकरण साधून, मायावती सत्ता मिळवतील, असे बोलले जायचे. पण सपा व काँग्रेसला परिस्थितीने एकत्र आणल्याने सारे चित्रच बदलले. पश्चिमी उत्तर प्रदेशात मायावतींना गेल्या वेळी २४ जागा मिळाल्या. यंदा त्यात वाढ होईल, असा प्रचार भाजपाने केला. सपा व बसपामध्ये मुस्लिम मतदारांचे विभाजन व्हावे, असा तयामागील हेतू. भाजपाचा हा खेळ यशस्वी झाल्यास कोणालाच बहुमत नाही, अशी स्थिती होऊ शकते. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. पण बसपाला भाजपपासून दूर ठेवण्याचा दिलेला शब्द मायावती अखेरपर्यंत पाळतील काय? इतकाच प्रश्न शिल्लक आहे.