शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मायावती जाणार १५ कोटींच्या बंगल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:38 IST

सरकारी बंगला सोडणार : सफाई व रंगरंगोटीची लगबग; आकाराने दुप्पट

लखनऊ : माजी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेश सरकारने दिलेला सरकारी बंगला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोडावा लागणार असल्याने बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती त्याहून दुप्पट आकाराच्या स्वमालकीच्या बंगल्यात मुक्काम हलविण्याची तयारी करत आहेत.मॉल अ‍ॅव्हेन्यूवरील ९ क्रमांकाचा सरकारी बंगला सोडून मायावती त्याच रस्त्यावर जवळच असलेल्या १३ क्रमांकाच्या बंगल्यात राहायला जाणार आहेत. या नव्या बंगल्याची सफाई व रंगरंगोटी करण्याची नोकरांची लगबग सुरु आहे. स्वत: मायावती यांनी रविवारी या बंगल्याला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. सामानसुमान हलविण्याचे काम सुरू असले तरी मुक्काम नेमका केव्हा हलविणार हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने मायावती यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस दिली तेव्हापासून त्यांनी आपल्या स्वत:च्या घरात स्थलांतर करण्याची तयारी सुरु केली. स्वत:चा बंगला असूनही मायावती यांनी सरकारी बंगला का सोडला नाही, हा प्रश्न आहे.५३ हजार चौ. फूटांचा बंगलामायावती यांना सरकारने दिलेला बंगला २३ हजार चौ. फूट आकाराचा होता. मायावतींचा स्वत:चा बंगला ५३ हजार चौ. फूट आकाराचा आहे. मोकळ््या जागेसह बंगल्याचे एकूण आवार ७१ हजार चौ. फुटांचे आहे.मायावती यांनी सत्तेत असताना ज्या लाल दगडाची स्मारके लखनऊ व अन्य शहरांमध्ये बांधली, त्याच ‘रेड सँड स्टोन’ने त्यांचा हा बंगला बांधला आहे. मध्यभागी असलेला प्रचंड आकाराचा घुमट हे या बंगल्याचे नजरेत भरणारे वैशिषट्य आहे. युपीत २००७ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्यानंतर तीनच वर्षांत नोव्हेंबर २०१० मध्ये हा बंगला १५ कोटींना खरेदी केला, अशी माहिती मायावती यांनीच दिली होती.मुलायम, राजनाथही तयारीतसपाचे नेते मुलायम सिंग यादव व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनाही सरकारी बंगले सोडावे लागणार आहेत. त्यांना अनुक्रमे ५, विक्रमादित्य मार्ग व ४ कालिदास मार्ग हे बंगले दिले होते. मुलायम सिंग यांनी नव्या घराचा सोध सुरु केला असून, राजनाथ सिंग गोमती नगरमधील स्वत:च्या बंगल्यात जाणार आहेत.

टॅग्स :mayawatiमायावती