शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांकडील संपत्तीचीही चौकशी करण्याची मायावती यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:22 IST

आपल्या कुटुंबियांना भाजप लक्ष्य करीत आहे असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी केला आहे.

लखनौ : आपल्या कुटुंबियांना भाजप लक्ष्य करीत आहे असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी केला आहे. मायावतींचा भाऊ आनंदकुमार यांची बेनामी संपत्ती असलेला नॉयडा येथील ४०० कोटी रुपये किमतीचा भूखंड प्राप्तीकर खात्याने ताब्यात घेतला. त्या पार्श्वभूमीवर मायावतींनी सांगितले की, भाजप नेत्यांकडे किती संपत्ती आहे याचीही मोदी सरकारने चौकशी करावी.यासंदर्भात मायावतींनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपच्या नेत्यांकडे किती संपत्ती आहे याची मोदी सरकार व त्याच्या तपास यंत्रणांनी चौकशी करावी. भाजप नेत्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी त्यांची असलेली स्थावर व जंगम मालमत्ता व आता त्यांच्याकडे असलेली संपत्ती यांची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.मायावती यांनी आरोप केला की, यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांत जनतेची मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने दोन हजार कोटी रुपये खर्च केले. लोकसभा निवडणुकांनंतर भाजप उत्तर प्रदेशमध्ये जातीपातीच्या आधारे आपल्या राजकीय खेळी करत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. >सर्वोच्च न्यायालयामुळे मला न्याय मिळालाकेंद्र सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्यानाट्या प्रकरणांत गोवत आहे, असा आरोप मायावती यांनी गुरुवारी केला होता. आपला भाऊ व बहीण यांचा सरकारने छळ मांडला असून, अशा कारवाईला मी भीक घालणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. २००३ साली तत्कालीन भाजप सरकारने प्राप्तीकर खाते, सीबीआयला हाताशी धरून माझ्यावरही काही खटले दाखल केले; पण त्याविरोधात मी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून मला न्याय मिळाला.

टॅग्स :mayawatiमायावती