शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"... आम्हाला हे कदापी मान्य नाही", वक्फ दुरुस्ती विधेयकावरून मौलाना भडकले; मुख्यमंत्री योगींसंदर्भातही केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:39 IST

maulana     khalid     saifullah     rahman     targeted     up     cm     yogi     adityanath     on     waqf     bill

सध्या संपूर्ण देशभरात वक्फ दुरुस्ती विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे. या विधेयकाला विविध मुस्लीम संघटना आणि नेते सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. या संदर्भात आता ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "आमच्यासाठी वक्फ सर्व काही आहे. वक्फचे नुकसान करण्याचा अर्थ, सर्व गोष्टींचे नुकसान करणे आहे," असे रहमानी यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले रहमानी? -मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी म्हणाले, "वक्फ सर्वकाही आहे. आमच्या मशिदी, मदरसे सर्वकाही. वक्फचे नुकसान करण्याचा अर्थ आहे, सर्व गोष्टींचे नुकसान करणे. यामुळे मुस्लिमांचे नुकसान होईल आणि हे आम्हाला कदापी मान्य नाही." यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. 

तेलंणाच्या मुख्यमंत्र्यांना खास अपील -मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी म्हणाले, आम्ही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, त्यांनी हे अजिबात स्वीकारू नये. सर्व विरोधी पक्ष याच्या विरोधात आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. यावेळी रहमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, योगींची खास संस्कृती आहे, बुलडोझर संस्कृती. गुन्हेगारांच्या जमिनीवर बुलडोझर चालवतात. यापेक्षा, गुन्हेगाराच्या जमिनी वक्फला देणे चांगले. योगी खोटे बोलतात. मुस्लिमांनी १२०० वर्षे राज्य केले पण कुणालाही कोणतीही समस्या आली नाही.काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ? -तत्पूर्वीमुख्यमंत्री योगी म्हणाले होते, पूर्वी वक्फ ज्या जमिनीवर दावा करायचा, ती त्यांची व्हायची. मात्र आता हे चालणार नाही. आता वक्फच्या नावाखाली  कुणीही मालमत्ता  हडप करू शकत नाही. तसेच, वक्फ दुरुस्ती विधेयक हे आजच्या काळाची गरज असल्याचेही योगी यांनी म्हटले होते.

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डMuslimमुस्लीमyogi adityanathयोगी आदित्यनाथ