शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रिक्स प्रकरण

By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST

मॅट्रिक्सच्या आणखी दोन संचालकांचा

मॅट्रिक्सच्या आणखी दोन संचालकांचा
अटकपूर्व जामीन फेटाळला

न्यायालय : कोट्यवधीचे फसवणूक प्रकरण

नागपूर : नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीच्या आशा टॉवरस्थित मॅट्रिक्स इन्फ्राइस्टेटच्या आणखी दोन संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
अमित ईश्वरी राव आणि राजेंद्र नामदेवराव भागवत, अशी या आरोपी संचालकांची नावे आहेत. यापूर्वी विजय त्रिलोकचंद वर्मा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
या प्रकरणात डॉ. सुचितकुमार दिवाण रामटेके याच्यासह १२ आरोपी आहेत. अमरावती येथील कैलास भीमराव पाटील यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी १८ जुलै २०१५ रोजी या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
आरोपींनी धंतोली येथे आपले कार्यालय उघडल्यानंतर विविध शहरात टाऊनशिप, डेव्हलपमेंट हाऊसिंग स्किम, व्यापारी संकुल आणि इतर रहिवासी बांधकाम उभारले जात असल्याबाबतच्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्या होत्या. ठिकठिकाणी प्रॉपर्टी शो आयोजित केले होते. जाहिरातीनुसार कैलास पाटील आणि इतरांनी या कंपनीच्या वानाडोंगरी येथील १.२७ हेक्टर जागेवरील प्रस्तावित रॉयल टाऊनशिप स्कीममध्ये फ्लॅट, दुकान, रो हाऊस रोख रकमेचा भरणा करून बुक केले होते. सर्व व्यवहाराचे ॲग्रीमेंट करून १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करून जागेचा ताबा देण्याचे कंपनीकडून कबूल करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपनीने वानाडोंगरीची ही जमीन खरेदीच केली नव्हती. संबंधित जिल्हाधिकारी, नगररचना, नासुप्र आदी शासकीय कार्यालयांकडून परवानगीही घेतली नव्हती. ही बनवाबनवी लक्षात येताच लोकांनी आपले पैसे परत मागितले असता त्यांना पैसेही परत करण्यात आले नाही. त्यांची फसवणूक करण्यात आली. १२ जून २०१० ते ७ डिसेंबर २०१२ या काळात ही फसवणूक करण्यात आली आहे.

अपूर्ण ---