मथुरा : मथुरेतील जवाहरबाग येथे अतिक्रमण करणारे आणि पोलीस यांच्यात उडालेल्या भीषण संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून २९ झाली आहे. रविवारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध ४५ प्रकरणे दाखल केली आहेत.अतिक्रमण करणाऱ्या एका अज्ञात इसमाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर आजमगड येथील पिंटू नावाचा इसम आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेज रुग्णालयात परण पावला. पोलिसांनी या हिंसाचारप्रकरणी ४५ प्रकरणे दाखल केली आहेत आणि त्यात ३००० लोकांना आरोपी बनविण्यात आले आहे. जवाहरबाग येथे शस्त्रे व स्फोटके शोधण्याचे मोहीम सोमवारपर्यंत सुरू राहील, असे पोलिसांनी सांगितले. या हिंसाचारात दगावलेल्यांपैकी आतापर्यंत केवळ तिघांची ओळख पडली आहे. त्यात दोन महिला आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी काहींनी या महिलांना ओळखले. ७२ तासांच्या आत नातेवाईकांनी ओळख पटविली नाही तर पोस्टमार्टम करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील, असेही पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
मथुरा हिंसाचार; मृतांची संख्या २९ वर
By admin | Updated: June 6, 2016 01:56 IST