शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाली लेक; वडिलांनी ऑर्डर केली तब्बल 10 लाखांची मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 16:41 IST

जन्माष्टमीच्या दिवशी देवाची पूजा आणि अभिषेक सोबतच गरिबांना अन्नदान करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील बंगळुरू येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने राधा-कृष्णाची मूर्ती बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. रघू बंगळुरू येथे संचालक म्हणून काम करतात आणि त्याची भगवान श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा आहे. त्यांनी सांगितले की काही काळापूर्वीपर्यंत त्यांचा देवावर विश्वास नव्हता, परंतु जेव्हा त्यांची मुलगी वसतिगृहात राहू लागली तेव्हा त्यांना तेथे असे लोक आढळले जे रोज भजन ऐकत आणि गीता पाठ करतात, त्यामुळे त्यांच्या मुलीचा देवावरील विश्वास वाढू लागला. 

घरीही य़ाचा परिणाम दिसून आला आणि त्यामुळे रघू देखील कृष्णाचे भक्त बनले आणि इस्कॉनमध्ये सामील होऊ लागले. त्यांनी पुढे सांगितलं की, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी भव्य स्वरूपात प्रकट व्हावेत, ही त्यांच्या मुलीची इच्छा होती आणि त्यांच्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वृंदावन येथून साडेआठ फूट उंच आणि 500 ​​किलोपेक्षा जास्त वजनाच्या राधा आणि कृष्णाच्या मूर्ती आणल्या. 

लवकरच आपल्या शहरात आश्रम आणि मंदिर बांधण्याचा त्यांचा विचार असून जन्माष्टमीच्या दिवशी देवाची पूजा आणि अभिषेक सोबतच गरिबांना अन्नदान करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. ही मूर्ती बनवणाऱ्या वृंदावन येथील अजयने सांगितले की, ही मूर्ती बनवण्यासाठी तब्बल सहा महिने लागले. 

रघू यांनी सोशल मीडियावरून त्याच्याशी संपर्क साधला. ब्रजमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी मूर्ती बनवण्यात आली आहे, ती ट्रकमध्ये चढवण्यासाठीही क्रेनची मदत घ्यावी लागली, त्यात प्रामुख्याने पितळ आणि तांब्याचा वापर करण्यात आला. राधाकृष्णाच्या मूर्तीची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.