शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फिंगर प्रिंट स्कॅनरवर बोटांचे ठसे जुळवल्यास "या" विद्यापीठात मिळणार प्रवेश

By admin | Updated: April 19, 2017 14:12 IST

राजधानीतल्या उस्मानिया विद्यापीठानं 26 एप्रिलला होणा-या शताब्दी कार्यक्रमानिमित्त नवं फर्मान काढलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - राजधानीतल्या उस्मानिया विद्यापीठानं 26 एप्रिलला होणा-या शताब्दी कार्यक्रमानिमित्त नवं फर्मान काढलं आहे. विद्यापीठाच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं तर केलं आहेच. मात्र त्यासोबत तुम्हाला आणखी एक काम करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला बारकोडवाला एंट्री पास मिळाला तरी तुम्हाला या कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणार नाही. प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला बोटांचे ठसे आधार कार्डच्या बायोमेट्रिक डेटाशी जुळवावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार काही विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी विद्यापीठाच्या या प्रकाराला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फिंगर प्रिंट स्कॅनर लावण्याचाही विचार केला आहे. ज्यामुळे फक्त योग्य व्यक्ती कार्यक्रमात प्रवेश करू शकणार आहे. बोटांचे ठसे घेण्यापासून फक्त व्हीआयपी अधिका-यांना सूट देण्यात येणार आहे. इतर सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला या कार्यक्रमात प्रवेश करण्यासाठी बोटांचे ठसे आधार कार्डच्या बायोमेट्रिक डेटाशी जुळवावे लागणार आहेत. सुरक्षेवर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितलं की, ब-याचदा गोंधळ घालण्यासाठी काही जण दुस-याचा एंट्री पास घेऊन कार्यक्रमस्थळी दाखल होतात आणि त्यानंतर धुमाकूळ घालतात. फिंगर प्रिंट स्कॅनरच्या माध्यमातून अशा समाजकंटकांवर पोलीस अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून कार्यक्रमस्थळी फक्त योग्य व्यक्तीच जाऊ शकतील. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील प्रत्येक गेटवर एक पोलीस कर्मचारी फिंगर प्रिंट स्कॅनर मशिन घेऊन उभा राहणार आहे. मात्र व्हीआयपी गेट त्याला अपवाद असेल. फिंगर प्रिंट स्कॅनर मशिनच्या माध्यमातून आधार डेटाबेसची माहिती जुळवण्यात आल्यावरच त्या व्यक्तीला विद्यापीठात प्रवेश मिळणार आहे.