शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्यांच्या व्हिंटेज कार खरेदीला प्रचंड प्रतिसाद

By admin | Updated: August 30, 2016 04:16 IST

मद्य उद्योजक विजय मल्ल्या यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी बँकांच्या मंडळाला बराच संघर्ष करावा लागत असताना मल्ल्या यांच्याकडील खास कार्सचा (व्हिंटेज कार्स) ताफा लिलावात

मुंबई : मद्य उद्योजक विजय मल्ल्या यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी बँकांच्या मंडळाला बराच संघर्ष करावा लागत असताना मल्ल्या यांच्याकडील खास कार्सचा (व्हिंटेज कार्स) ताफा लिलावात विकत घेण्यासाठी मात्र अगदी सगळ््यांची धडपड झालेली बघायला मिळाली.मल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सकडील (ही कंपनी आता अस्तित्वात नाही) प्रचंड मोठे थकलेले कर्ज वसुलीसाठी यापूर्वी त्यांच्या मालमत्ता विकायला काढल्या असताना बँकांच्या मंडळाला असा प्रतिसाद लाभला नव्हता. २५ आॅगस्ट रोजी या कार्सचा लिलाव आॅनलाईन करण्यात आला. त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद लाभला की दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत लिलावाचे आयोजक क्विप्पो व्हॅल्युअर्स अँड आॅक्शनियर्स यांना तो सुरूच ठेवावा लागला. सतत बोली लागत असल्यामुळे त्याचा कालावधी दहा दहा मिनिटांनी वाढवावा लागला, असे सूत्रांनी सांगितले. या कार्स सध्या मुंबई, गोवा, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता येथे ठेवलेल्या आहेत. देशात अशा प्रकारचा लिलाव प्रथमच झाला परंतु युनायटेड स्पिरीटसने बोली यशस्वी झाल्या तरी त्या रद्द करण्याचे हक्क राखून ठेवले आहेत. याबाबतची अंतिम घोषणा लवकरच केली जाईल. थकीत कर्जाबद्दल मल्या यांच्यावर सध्या न्यायालयांत खटले सुरू आहेत. त्यांचे व्हिंटेज व क्लासिक कार्सचे प्रेम सर्वज्ञात आहे. त्यांच्याकडे १०० अशा कार्स असल्याचे वृत्त होते. परंतु त्यांच्या नावावर त्या कागदोपत्रीहीआहेत का हे स्पष्ट नाही.