बुधवारी दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पालम भागातील साध नगर येथील चार मजली इमारतीला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत तीन मुलांसह एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर इतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर एकाच कुटुंबातील नऊ ते दहा सदस्य इमारतीत अडकले होते. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि रुग्णवाहिकांची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले.
तळमजल्यावरील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग तळमजल्यावरून वरच्या मजल्यांवर पसरल्याने कुटुंब अडकले. तळमजल्यावर कुटुंबाची सौंदर्यप्रसाधने आणि इतर दुकाने आहेत, तर ते वरच्या मजल्यांवर राहतात.
तीन जणांना रुग्णालयात केले दाखल
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या तीन मुलांना पालम येथील दिव्या प्रस्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तीन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या, तर अरुंद आणि गर्दीच्या भागामुळे इतर रुग्णवाहिका दूर अंतरावर उभ्या करण्यात आल्या होत्या.
चार मजली इमारतीच्या एका भागात आग लागली आणि धूर वेगाने संपूर्ण इमारतीत पसरल्याने कुटुंबातील सदस्य आत अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
Web Summary : A fire in a four-story building in Delhi's Palam area killed six, including three children, from one family. Short circuit is suspected as the cause. Firefighters rescued three injured individuals. The building housed shops on the ground floor and residences above.
Web Summary : दिल्ली के पालम इलाके में एक चार मंजिला इमारत में आग लगने से एक ही परिवार के तीन बच्चों समेत छह लोगों की मौत हो गई। शॉर्ट सर्किट से आग लगने का संदेह है। दमकल कर्मियों ने तीन घायलों को बचाया। इमारत में नीचे दुकानें और ऊपर घर थे।