शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

देशातील हवाई दलाचे महान योद्धे मार्शल अर्जन सिंह पंचत्वात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:14 IST

देशातील हवाई दलाचे महान योद्धे मार्शल अर्जन सिंह यांच्यावर, दिल्लीच्या ब्रार चौकात सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक राजकीय नेते व तिन्ही दलांचे प्रमुख आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत, अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अर्जन सिंह ...

देशातील हवाई दलाचे महान योद्धे मार्शल अर्जन सिंह यांच्यावर, दिल्लीच्या ब्रार चौकात सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक राजकीय नेते व तिन्ही दलांचे प्रमुख आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत, अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अर्जन सिंह यांना तोफांची सलामी देण्यात आली आणि भारतीय हवाई दलाच्या तीन सुखोई लढाऊ विमानांनी फ्लाई पास्ट करून, हवाई दलाचे एकमेव पाचव्या रँकचे मार्शल अर्जन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुखोई विमानांनी ‘मिसिंग मॅन फॉर्मेशन’बनविले. हवेत बनविले जाणारे हे फॉर्मेशन, दिवंगत सैन्य अधिका-यांच्या सन्मानार्थ बनविण्यात येते. राजधानी दिल्लीत सर्व सरकारी इमारतींवरील तिरंगा सोमवारी अर्ध्यावर फडकाविण्यात आला. पंजाबमध्ये राज्य सरकारने तीन दिवसांचा शोक जाहीर केला आहे. त्यांच्या पश्चात एकमुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या पत्नीचे २०११ मध्ये निधन झाले होते.