शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न, हनीमून अन् शारीरिक संबंधांना नकार...; अखेर ५० तासांनंतर 'फॅमिली ड्रामा' संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:33 IST

५० तासांपासून शालिनी पती प्रणवच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत होती. त्यात मध्यस्थांकडून हा वाद मिटवून तोडगा काढण्यात आला आहे

मुजफ्फरनगर - यूपीच्या मुजफ्फरनगर येथे राहणारी शालिनी सिंघल या महिलेने सासरच्या गेटसमोर सुरू केलेले आंदोलन जवळपास ५० तासांनी मागे घेतले आहे. शालिनीला पती प्रणव सिंघल यांच्या घरी म्हणजे सासरी एन्ट्री मिळाली आहे. स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. नेते, वयोवृद्धांनी दोन्ही कुटुंबाशी संवाद साधल्यानंतर यावर तोडगा निघाला. शालिनी यांनी पती प्रणव यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. लग्नानंतर प्रणवने ५० लाख रूपये मागितल्याचा दावा पत्नी शालिनीने केला होता. 

पैसे दिले नाहीत म्हणून पतीने शालिनीनाला तिच्या माहेरी सोडले आणि तिथून परत घेऊन जात नव्हता. जेव्हा स्वत: ती सासरी आली तेव्हा सासरच्यांनी घरचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सासरच्या घराबाहेरच तिने धरणे आंदोलन सुरू केले. पती-पत्नी हनीमूनवरून परतल्यापासून हा वाद सुरू झाला होता. हे जोडपे हनीमूनसाठी इंडोनेशियाच्या बाली येथे गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. तर पत्नीचे आरोप पतीने फेटाळत मी पैशांची मागणी केली नाही, लग्नानंतर पत्नीने शारीरिक संबंध बनवायला दिले नाहीत. हात लावला तर केस दाखल करेन, वकील आहे असं पत्नीने धमकावल्याचं पती प्रणवने म्हटलं.

हनीमूनवरून परतल्यानंतर वाद

शालिनी आणि प्रणव यांचं लग्न याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या १२ तारखेला झाले होते. लग्नानंतर दोघेही हनीमूनसाठी इंडोनेशियाला गेले. लग्नानंतर सासरच्यांनी मी आवडत नव्हते. हनीमूनला पतीसोबत गेली परंतु तो एकही शब्द बोलला नाही. केवळ ५० लाखांच्या हुंड्याची मागणी केली. आता सासरचे मला घरातही घेत नाहीत असा आरोप शालिनीने केला त्यावर मला तिच्या जवळही येऊ देत नव्हती. शारीरिक संबंधाला विरोध करत होती. शालिनीपासून माझ्या जीविताला धोका आहे असा आरोप पतीने केला आहे.

वादावर काढला तोडगा

५० तासांपासून शालिनी पती प्रणवच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत होती. त्यात मध्यस्थांकडून हा वाद मिटवून तोडगा काढण्यात आला आहे. शालिनीला पती प्रणवच्या घरात एन्ट्री मिळाली आहे. पत्नीच्या आंदोलनाची बातमी माध्यमांत झळकल्यानंतर जोडप्यातील वाद संपवण्यासाठी अनेक प्रतिष्ठित लोक आले. त्यात सपा, रालोद आणि भाजपा नेतेही पुढे होते. या जोडप्यात तोडगा काढण्यात आला. त्यानंतर नव्या नवरीनं धरणे आंदोलन मागे घेतले. या लोकांनी दोन्ही जोडप्यांना समोरासमोर बसवून वाद मिटवला त्यानंतर शालिनी आणि प्रणव दोघे एकत्रित घरात गेले. 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदार