शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:45 IST

राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत.

श्रीनगर : ३७० कलम रद्द केल्यानंतर अठराव्या दिवशी गुरुवारी काश्मीरच्या बहुतेक भागांमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर लोकांची थोडीफार वर्दळ व वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, काश्मीरमधील सर्व बाजारपेठा बंद आहेत. मोबाईल व इंटरनेटवरील बंधने मात्र दूर करण्यात आलेली नाहीत.यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीरमधील परिस्थिती शांत असून बुधवारी कोणताही हिंसक प्रकार घडला नाही. श्रीनगर व काश्मीरमधील अन्य जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर लोकांची थोडीफार वर्दळ, वाहनांची ये-जा होताना दिसत होती. सार्वजनिक वाहतुकीची वाहने अद्यापही बंदच आहेत. काही प्रमाणात टॅक्सी व आॅटोरिक्षाची सेवा मात्र सुरू झाली आहे.शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थितीही यथातथाच आहे. मात्र, शाळेत अजून विद्यार्थी फिरकलेले नाहीत. राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी सुरक्षा दले सतर्क आहेत. ५ आॅगस्टपासून काश्मीरमधील बहुसंख्य बाजारपेठा बंदच आहेत.दरम्यान काश्मीरमधील लष्कर तसेच सशस्त्र सुरक्षा दलांना तूर्त हटवण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत सशस्त्र दलाचे जवान तिथेच राहतील. (वृत्तसंस्था)दिल्लीत निदर्शनेनवी दिल्ली : काश्मीरमध्ये अटक केलेल्या नेत्यांची सुटका करावी या मागणीसाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यासह विरोधी पक्षांनी जंतरमंतर येथे गुरुवारी धरणे धरले होते. त्यामध्ये पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती हेही सहभागी झाले.या धरण्यात सामील झालेल्यांमध्ये काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, राजदचे मनोज झा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी आदी नेते होते. जनता व लोकप्रतिनिधींचे मत जाणून घेतल्याशिवाय ३७० कलम रद्द करणे ही लादलेली अप्रत्यक्ष आणीबाणीच आहे, असा ठराव या धरण्याच्या वेळी विरोधी पक्षांनी संमत केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर