शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मार्क झुकरबर्गने स्नॅपचॅटला डिवचलं, म्हणाले फेसबुक सर्वांसाठी

By admin | Updated: April 19, 2017 21:43 IST

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही स्पीगल यांच्या त्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंतांसाठी आहे असं वादग्रस्त विधान स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांनी केलं होतं. त्यानंतर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि विविध स्थरांतून स्पीगल यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही स्पीगल यांच्या त्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. 
 
फेसबुक केवळ मोठ्या युजर्ससाठी नसून ते समाजातील सर्व लोकांसाठी आहे. ज्या गोष्टी युजर्सला हव्या असतील त्याबाबत आम्ही विचार करतो आणि त्या समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असं कॅलिफोर्नीयामध्ये एका कार्यक्रमात बोलताना झुकरबर्ग म्हणाले. टेकक्रंचने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
 2015 मध्ये  "ग्रोथ ऑफ अॅप्स यूजर बेस इन" या विषयावरील चर्चेसाठी झालेल्या बैठकीत इवान स्पीगल यांनी भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंतांसाठी आहे  हे वक्तव्य केलं होतं. या बैठकीत एका कर्मचा-याने भारतात आपल्या अॅपचा झपाट्याने प्रसार होत नाही याबाबत चिंता व्यक्त केली असता, त्या कर्मचा-याचं म्हणणं ऐकून न घेता स्पीगल म्हणाले, मी भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशात व्यापार वाढवू इच्छित नाही. आपलं अॅप हे फक्त श्रीमंतांसाठी आहे. 
 
स्पीगल यांच्या या वक्तव्यानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी इव्हान यांच्या वक्तव्यावर टीका करत हे अॅप अनइन्स्टॉल करण्यास सुरुवात केली होती. तसेच ह्या अॅपला वाईट रेटिंग देण्यासही सुरुवात झाली होती.त्यामुळे गुगल स्टोअरवर स्नॅपचॅटची रेटींग झपाट्याने उतरली होती.