शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’चा संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा; सरकारने लोकशाही पद्धतीने वागावे : खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:12 IST

‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. पंतप्रधानांनी सुरक्षा भंगावर न बोलून संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला.

‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला. विजय चौक येथे खरगे म्हणाले की, लोकशाहीत बोलणे हा विरोधकांचा अधिकार असून, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना संसदेत पोहोचवणे, ही खासदारांची जबाबदारी आहे. संसद ही मोठी पंचायत आहे. कोणी संसदेत बोलायचे नसेल तर मग कोठे बोलायचे?विरोधी पक्षाचे खासदार सभापती धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावर बोलू देण्याची विनंती वारंवार करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे सदस्य कामकाजात अडथळा आणत आहेत. यावरून भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेस प्रमुखांनी केला. खरगे यांनी सरकारला लोकशाही पद्धतीने वागण्याचे आवाहनही केले.

मूळ मुद्यावरून भरकटवणे हेच कामजातनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर गप्प राहिल्यानंतर आता सरकार शेतकरी व जातीबद्दल बोलत आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. मोडतोड करणे, मूळ मुद्यांवरून भरकटवणे ही त्यांची कार्यपद्धती आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद