शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बडोद्यात घुमला मराठीचा जागर; साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या, ग्रंथदिंडीत हजारो नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:47 AM

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी येथील लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीला तीन वर्षांच्या लहानगयापासून ते साठीच्या आजीआजोबांनी आर्वजून सहभाग घेतला होता.

- स्नेहा मोरेबडोदा साहित्यनगरी : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी येथील लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीला तीन वर्षांच्या लहानगयापासून ते साठीच्या आजीआजोबांनी आर्वजूनसहभाग घेतला होता. एरव्ही केवळ गुजराती भाषेचे बोलऐकू येणाºया बडोद्यात या ग्रंथ दिडींचा श्रीगणेशा मात्र ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम...च्या’ गजराने झाला.ग्रंथदिडीची धुरा नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखयांनी सांभाळली. स्वागताध्यक्षश्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. श्रीपाद जोशी, मराठी वाड्मय परिषद बडोदेचे दिलीप खोपकर आदी सहभागी झाले होते.बडोदे येथे स्थायिक असलेल्या मराठी बांधवांनी या ग्रंथदिंडीसाठी उत्साहात तयारी केल्याचेदिसून आले. दुपारपासून ढोलताशा पथक, लेझीम पथक, वारकरी समुदाय, किर्तनकार आणिकाही सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा जल्लोष कानी येत होता. पारंपरिक वेष, नाकात नऊवारी आणि डोक्यावर फेटा परिधान करुन सर्वचजण साहित्यरंगी रंगले. ग्रंथदिंडीत शाळकरी विद्यार्थी- विद्याथीर्नींनी छत्रपती शिवाजी महाराज, नामदेव, झाशीचीराणी, भारतमाता, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे पोशाख धारण केले होते. तरकाही लहानग्यांनी चालत्या ट्रकमध्ये मल्लखांब आणि दोर मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचेलक्ष वेधले.मराठी वाचा, मराठी वाचवाशब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, अशा संदेशाचे फलक हाती घेऊन ‘मराठी वाचा , मराठी वाचवा’ असा संदेश शाळकरी मुलांनी दिला.अन् फुगडीचा मोह आवरलाच नाही... संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. अबालवृद्धांचा उत्साह पाहून त्यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. ग्रंथदिंडीतील ज्येष्ठांच्या चमूत सहभागी होऊन त्यांनीही फुगडीचा फेर धरला.या संमेलनाच्या निमित्ताने ८३ वषार्नंतर मराठी बांधवांनी बडोदे गाठले आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ज्या भूमीतून मराठी भाषेचे वैभव जाणले आज त्याच पुण्यनगरीत हा साहित्य मेळा होतोय,याचा विशेष आनंद आहे. त्यामुळे हे संमेलन निश्चितच यशस्वी होईल. -राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, स्वागताध्यक्ष

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन