शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट पुरस्कारांत मराठीची वाहवा, श्रीदेवी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 05:52 IST

अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे डोळे ज्याकडे लागलेले असतात, त्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, प्रख्यात दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर ‘मॉम’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल दिवंगत श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली : अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे डोळे ज्याकडे लागलेले असतात, त्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, प्रख्यात दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर ‘मॉम’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल दिवंगत श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. ख्यातनाम दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने पुरस्कारप्राप्त चित्रपट तसेच भूमिका, दिग्दर्शन आदींची निवड केली. उत्तम करमणूक करणारा चित्रपट म्हणून ‘बाहुबली २’ ठरला आहे.यंदाच्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील ‘मृत्युभोग’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा तर सुयश शिंदे यांच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेते प्रसाद ओकचा ‘कच्चा लिंबू’ यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व रवी जाधव यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या आणि प्रेक्षकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता. ‘म्होरक्या’ चित्रपटाला विशेष कामगिरीसाठीचा पुरस्कार घोषित करण्यात आला असून, ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचा गौरव केला जाणार आहे.नर्गिस दत्त पुरस्कारासाठी निपुण धर्माधिकारी यांच्या ‘धप्पा’ची निवड झाली आहे. ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांनाही पुरस्कार घोषित झाला आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जातील.>मृत्युभोग, मयत, म्होरक्या, कच्चा लिंबू, ठप्पा, चंदेरीनामा,पावसाचा निबंध यांनाही पुरस्कारमराठीसाठीचे पुरस्कारसर्वोत्कृष्ट चित्रपट : कच्चा लिंबूसर्वोत्कृष्टबालचित्रपट : म्होरक्यास्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) : म्होरक्या (यशराज कºहाडे)सर्वोत्कृष्टसंकलन : मृत्युभोगसर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (लघुपट) : पावसाचा निबंध (नागराज मंजुळे)सर्वोत्कृष्ट लघुपट(नॉन फीचर) मयत (सुयश शिंदे)सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट : चंदेरीनामा (राजेंद्र जंगले)नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) धप्पा (निपुण धर्माधिकारी)