राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावर माओवाद्यांचा हल्ला
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
कोच्ची-येथील कलासमेरीमध्ये असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग मंडळाच्या कार्यालयावर गुुरुवारी सकाळी संदिग्ध माओवाद्यांनी हल्ला चढवून कार्यालयातील सामानाची मोडतोड केली.
राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावर माओवाद्यांचा हल्ला
कोच्ची-येथील कलासमेरीमध्ये असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग मंडळाच्या कार्यालयावर गुुरुवारी सकाळी संदिग्ध माओवाद्यांनी हल्ला चढवून कार्यालयातील सामानाची मोडतोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. या कार्यालयात काही कागदपत्रे जमिनीवर विखुरलेल्या अवस्थेत आढळून आली तर काही जळालेल्या स्थितीत दिसली. या ठिकाणी माओवाद्यांनी टाकून दिलेली काही पत्रकेही पोलिसांना मिळाली आहेत.कोच्चीचे पोलीस आयुक्त के.जी. जेम्स यांनी हे कृत्य माओवाद्यांचे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.