शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोदी सरकारवर शरद यादवांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:06 IST

नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद (यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते

सुरेश भटेवरानवी दिल्ली : नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद (यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते मात्र रविवारी एका व्टीट व्दारे मोदी सरकारवर त्यांनी हल्ला चढवला आहे.शरद यादव म्हणाले, ‘पनामा पेपर्समध्ये उल्लेख असलेल्या भारतीयांपैकी एकालाही मोदी सरकारने पकडलेले नाही. परदेशात दडवलेले काळेधन परत आणणार ही मोदींची मुख्य घोषणा होती. त्या दिशेने केवळ निवडक कारवाईच आजपर्यंत झाल्याचे चित्र आहे.विविध सेवांच्या नावाखाली सरकार जनतेकडून विविध प्रकारचे सेस वसूल करीत आहे. या रकमेतून कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय बदल झालेला नाही. असफल ठरलेली पीक विमा योजना याचे ठळक उदाहरण आहे. केवळ खाजगी कंपन्यांना नफा मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.बिहारमधील महाआघाडीतून जद(यु)ने तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून शरद यादव नितीशकुमारांवर नाराज असल्याची उघड चर्चा राजधानीत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीशकुमारांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर रविवारपर्यंत यादव गप्प होते. विशेषत: नितीशकुमारांच्या विरोधात एक शब्दही त ेबोललेले नाहीत. शरद यादवांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून लालूप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचे त्यांना आवाहन केले.टिष्ट्वटरवर लालूप्रसाद म्हणाले : देशात गरीब, वंचित व शेतकरी वर्गावर संकट कोसळले आहे. या आपत्तीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक जोरदार आंदोलन उभे करावे लागेल. देशाला पुन्हा एका नव्या संघर्षाची आता गरज आहे, शरदभाई त्यासाठी तुम्ही या. पूर्वीही आपण बरोबर संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या आहेत. पुन्हा एकदा सारे मिळून या दक्षिणपंथी हुकुमशाहीला नेस्तनाबूत करू.