शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अनेक प्रकल्प साकारले

By admin | Updated: October 10, 2014 02:58 IST

चांगल्या कामांना विरोध करण्याचे काम विरोधक करीत आहेत. प्रजा फाउंडेशन या संस्थेने आमदारांच्या कामांवर तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये सलग चारवेळा मला ‘मिस्टर कमिटेड’ म्हणून गौरविले आहे

मतदारसंघात तुमच्याविरोधात नाराजी असल्याची टीका विरोधकांमधून होत आहे. त्याबद्दल काय सांगाल?- चांगल्या कामांना विरोध करण्याचे काम विरोधक करीत आहेत. प्रजा फाउंडेशन या संस्थेने आमदारांच्या कामांवर तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये सलग चारवेळा मला ‘मिस्टर कमिटेड’ म्हणून गौरविले आहे. विधानसभेत मुंबईतील समस्यांवर सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. नरे पार्कमध्ये स्विमिंग पूल, क्रीडा संकुल, शिवडीचा किल्ला, डायलेसिस सेंटर, इंग्रजी माध्यमाची शाळा अशा विविध प्रकल्पांतून मी १०० टक्के निधीचा वापर केला आहे. फिरत्या वाहनांच्या माध्यमातून स्वस्त भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे २ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. विरोधकांच्या बाकावर बसून शासनाकडून १० कोटी रुपयांचा निधी शिवडीकरांसाठी मिळवला.पुढील पाच वर्षांत तुमचे व्हिजन काय?- शिवडीच्या किल्ल्याच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकांना एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ उपलब्ध करून देणार आहे. त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. राज्यातील विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना पाहता ९ वर्षांवरील तरुणींना प्रशिक्षित कमांडोकडून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरून कोणत्याही मुलीला तिचे पालक निर्धास्तपणे घराबाहेर पडू देतील. याशिवाय लोकांकडून विविध संकल्पना मी मागवत असतो. लोकांना जे हवे आहे, ते मी देण्याचा प्रयत्न करतो.मतदार तुम्हाला पुन्हा एक संधी देतील का?- माझगावमधील नागरिकांनी मला चारवेळा निवडून दिले ते माझ्या कामामुळे. आपण निवडून दिलेला आमदार राज्यभर एका पक्षाचे नेतृत्व करतोय, याचा अभिमान शिवडीकरांनाही आहे. माझगावकरांइतकाच वेळ शिवडीकरांना देता आला नाही, याची खंत आहे. मात्र शिवडीकरांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, संगीतकार स्व. ठाकरे उद्यान, कै. विवेक खाड्ये स्मृती भवन, भावसार समाज हॉल, लालबागचे बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह असे अनेक प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. असे अनेक प्रकल्प उभारण्यासाठी पुन्हा एकदा ते मलाच संधी देतील, यात शंका नाही.