शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

अनेक बडे मासे सीबीआयच्या जाळ्यात; आरोपींमध्ये विदेशी मद्याच्या बड्या कंपन्यांचे तसेच माध्यम प्रतिनिधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:34 IST

दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाबाबत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीच्या जाळ्यात अनेक विदेशी मद्य कंपन्यांचे भारतीय प्रतिनिधी व माध्यमाचे बडे मासे अडकत आहेत. 

शरद गुप्तानवी दिल्ली :

दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाबाबत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीच्या जाळ्यात अनेक विदेशी मद्य कंपन्यांचे भारतीय प्रतिनिधी व माध्यमाचे बडे मासे अडकत आहेत. या प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माध्यम सल्लागार विजय नायर, अब्सोल्यूट व ग्लॅनलिवेट यासारखे महागडे मद्य तयार करणारी कंपनी परनोद रिकर्डचे माजी उपाध्यक्ष मनोज राय, बिंदको स्पिरीट्सचे मालक अमनदीप ढल, इंडोस्पिरीटचे मालक समीर महेंद्रू, बडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित अरोरा, राधा इंडस्ट्रीजचे मालक दिनेश अरोरा, महादेव लिकरचे मालक सनी मारवाह व नॅशनल मीडिया सेंटरचे अर्जुन पांडे यांची नावे आहेत.

एफआयआरमध्ये आरोपी केलेले अर्जुन पांडे दोन वर्षांपूर्वी एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीमध्ये प्रेसिडेंट सेल्स मार्केटिंग व स्ट्रॅटजी पदावर दाखल झाले होते. त्यांच्या चॅनेलचे सीईओ व संपादक भूपेंद्र चौबे हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकट सहयोगी आतिशी मारलेना यांचे मेहुणे आहेत. तर विजय नायर मुंबईस्थित एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ओन्ली मच लाऊडरचे सीईओ राहिलेले आहेत. ते मागील ८ वर्षांपासून ‘आप’शी जोडले गेलेले आहे. ते अनेक सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करायचे. ते मागील काही काळापासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माध्यम सल्लागार होते. सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, समीर महेंद्रू, दिनेश अरोरासारख्या मद्य कंपन्यांचे प्रतिनिधी व मालकांकडून विजय नायर तसेच अर्जुन पांडे यांनी कोट्यवधी रुपये रोख जमा केले व पाहिजे तसे मद्य धोरण तयार करण्यासाठी वाटले. 

हा आहे आरोपकेजरीवाल सरकारवर आरोप आहे की, विदेशी मद्य दुकानांचे कमिशन दोन टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर केले. तसेच शाळा व कॉलनींजवळील प्रतिबंधित ठिकाणांवरही मद्याची दुकाने उघडण्यात आली.

उपराज्यपालांनी दिली नव्हती परवानगीतत्कालीन उपराज्यपाल अनिल बैजल यांनी एक निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे की, प्रतिबंधित ठिकाणी मद्य दुकाने उघडण्याचा फैसला दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारचा होता. त्यांनी ६७ प्रतिबंधित वॉर्डमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नव्हती.सर्वांनी मिळून तयार केले धोरणकेजरीवाल सरकारचे म्हणणे आहे की, मद्य धोरण तत्कालीन उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या सहमतीनेच तयार केले होते. हे धोरण तत्कालीन विधि सचिव, गृह सचिव, वित्त सचिव व अबकारी सचिवांनी मिळून तयार केले होते.

टॅग्स :AAPआप