नाशिक : पर्यावरण रक्षण व सिंहस्थकाळात लाखो भाविकांकडून वापरात येणार्या पूजा साहित्यापासून होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नाशिक मनपा व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने, निर्माल्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने हाती घेण्यात आल्याची घोषणा सेवामार्गाच्या पर्यावरण, प्रकृती विभागाचे प्रमुख आबासाहेब मोरे यांनी केले.बुधवार, दि. १ जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने आयोजित स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांनी रामकुंड परिसरात स्वच्छता केली. उपस्थित सेवेकर्यांशी यानिमित्ताने आबासाहेब मोरे यांनी संवाद साधताना वरील घोषणा केली. ते म्हणाले, श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे कार्य सातत्याने राज्यभरातील केंद्रांवर सुरूच असते; परंतु सिंहस्थाच्या निमित्ताने ते व्यापक रूपात हाती घेण्यात येईल. निर्माल्यापासून शहरातील सर्व समर्थ केंद्रांमधून खताची निर्मिती करण्यात येईल. हे खत शेतकर्यांपर्यंत पोहोचवले जाईल.लवकरच येणार्या गणेशोत्सवात घराघरात मातीच्या गणपतींची स्थापना व्हावी, गणपती मूर्ती स्वत: बनवता याव्यात म्हणून दिंडोरीत व काही केंद्रांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळावा म्हणून सिंहस्थ काळात लाखो कापडी व कागदी पिशव्यांचे मोफत वाटप सेवामार्गाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)कॅप्शन :स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांनी रामकुंड परिसराची स्वच्छता केली.
पर्यावरण रक्षणासाठी निर्माल्यापासून खतनिर्मिती : आबासाहेब मोरे
By admin | Updated: July 7, 2015 00:05 IST