शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मनूचा मनुस्मृतीशी अर्थाअर्थी संबंध नाही, संस्कार भारतीचा दावा

By admin | Updated: May 10, 2017 20:54 IST

मनुस्मृती’च्या निमित्ताने मनुवर टीकेची झोड उठवणाऱ्या भारतातल्या विविध राजकीय पक्षांनी ज्याप्रकारे आजवर मनुला अकारण बदनाम केले,

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 10 - ‘मनुस्मृती’च्या निमित्ताने मनुवर टीकेची झोड उठवणाऱ्या भारतातल्या विविध राजकीय पक्षांनी ज्याप्रकारे आजवर मनुला अकारण बदनाम केले, तो एकतर्फी प्रयोग रा.स्व.संघाच्या संस्कार भारतीला मान्य नाही. अर्धवट माहिती व अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे मनुवर ही टीका होत असल्याचा दावा करीत, संस्कार भारतीने मनुच्या उजळ बाजूचे सत्य प्रकाशात आणण्याचा तसेच मनुच्या व्यक्तिमत्वाचे मेकओव्हर करून जनतेचे या संदर्भातले सारे भ्रम दूर करण्याचा निर्धार केला आहे. मनुस्मृती व वेदांमधील काही संकल्पनांंबाबतचा अपप्रचार दूर करण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयानेही तज्ज्ञ इतिहासकारांमार्फत संशोधन करावे व सत्य जगासमोर आणावे, असा आग्रह संस्कार भारतीचे सह संघटनमंत्री अमीरचंद यांनी केला आहे. मनुस्मृतीचा कालखंड आजपासून 1800 ते 2400 वर्षे जुना आहे तर मनुचा जन्म 8000 वर्षांपूर्वी झाल्याचे बहुतांश इतिहासतज्ज्ञ मानतात, असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, मनुच्या जन्मानंतर तब्बल 5 हजार वर्षांनी अस्तित्वात आलेल्या मनुस्मृतीवरील टीकेचे खापर मनुवर फोडणे सर्वथा अयोग्य व अन्यायकारक आहे. त्याचबरोबर अमीरचंद हे देखील मान्य करतात की मनुस्मृतीत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. व्यापक समाजहित लक्षात घेता तो योग्य नाही. आगामी पिढ्यांपर्यंत फक्त चांगल्या गोष्टीच पोहोचाव्यात यासाठी मनुस्मृतीतल्या वादग्रस्त गोष्टी दुरुस्ती घडवून बाद केल्या पाहिजेत.मनुच्या इतिहासकालीन व्यक्तिमत्वाबरोबरच वेदांमधील काही संकल्पनांबाबतही जनतेत भ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही लोकांमार्फत केला जातो. असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, भारतीय संस्कृतीच्या मूलतत्वांकडे आजवर जे दुर्लक्ष झाले त्यात सुधारणा घडवण्याचे व हा भ्रम दूर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे चर्चासंवाद, इतिहासकालीन विषयांवर कार्यशाळा, व व्यापक संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, संस्कार भारतीतर्फे ही मागणीही केंद्र सरकारकडे केली जाईल.