निफाड : तालुक्यातील बोकडदरे येथे मनोरु ग्ण महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्या चौघा संशयितांपैकी दोघांना बोकडदरे ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोकडदरे येथे शुक्र वारी (दि. ४) रात्री आठच्या सुमारास एक मनोरु ग्ण महिला रस्त्याच्या कडेने जात असताना बोकडदरे येथील हनुमंत पिंपळे, मारु ती बच्छाव, योगेश माळी, ज्ञानेश्वर पिंपळे या चौघा संशयितांनी या महिलेला बळजबरीने पकडून रिक्षात बसवून बोकडदरेच्या वन विभागाच्या जंगलाच्या भागाकडे नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी या चौघांचा पाठलाग करून यातील दोघांना पकडले व निफाड पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन संशयित मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी बोकडदरेचे सरपंच भाऊसाहेब दराडे यांनी निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यानुसार निफाड पोलीस ठाण्यात या चौघा संशयितांविरु द्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ात वापरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मनोरु ग्ण महिलेचे अपहरण करणार्या दोघांना अटक
By admin | Updated: March 6, 2016 23:45 IST