शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मनोजच्या मृत्यूने कुटंुबाची वंशावळच नष्ट कुटुंबात मृत्यूची मालिका थांबेना : मातेच्या आक्रोशाने अश्रू आवरणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 22:00 IST

जळगाव: जिल्हा पोलीस दलात असलेल्या मनोज अशोक दारकुंडे (वय २९ रा.भुसावळ) यांच्या बुधवारी अपघाती मृत्यूने दारकुंडे कुटुंबाची वंशावळच नष्ट झाली आहे. दारकुंडे यांच्या कुटुंबावर आलेल्या आघाताची कहाणी मन थक्क करणारी आहे. दुश्मनावरही अशी वेळ येऊ नये असे प्रत्येकजण बोलताना दिसत नव्हते.

जळगाव: जिल्हा पोलीस दलात असलेल्या मनोज अशोक दारकुंडे (वय २९ रा.भुसावळ) यांच्या बुधवारी अपघाती मृत्यूने दारकुंडे कुटुंबाची वंशावळच नष्ट झाली आहे. दारकुंडे यांच्या कुटुंबावर आलेल्या आघाताची कहाणी मन थक्क करणारी आहे. दुश्मनावरही अशी वेळ येऊ नये असे प्रत्येकजण बोलताना दिसत नव्हते.
मनोजचा लहान भाऊ धनंजय याचा आठ वर्षापूर्वी भुसावळलाच खडका चौकात अपघातात मृत्यू झाला होता. मित्राला सोडण्यासाठी जात असताना त्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तो जागीच ठार झाला होता.त्या घटनेंनतर चार वर्षांनी ह्दयविकार व किडनीच्या आजाराने वडील अशोक दारकुंडे यांचा मृत्यू झाला. वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांच्या मृत्यूमुळे आई त्यांच्या जागी नोकरीला लागली होती. बहीण सीमा विवाहित आहे. चिंचोली ता.जळगाव येथे दिलेली आहे.
जग पाहण्याआधीच मुलाचा मृत्यू
पितृछत्र हरपल्यानंतर मनोजचा प्रिया हिच्याशी विवाह झाला. दोघांचा संसार सुखाचा चालला असतानाच त्यात मिठाचा खडा पडला. दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले.अशातच त्यांच्या कुटुंबात आनंदाची बातमी आली.पत्नी प्रिया गरोदर राहिल्या. सारे दु:ख विसरून मनोज व त्याच्या आईला प्रचंड आनंद झाला. पहिलाच मुलगा होणार असल्याने नातेवाईकही कमालीचे खूष होते.मात्र हा आनंद काही काळच राहिला. प्रसूती होण्याआधीच बाळाचा पोटात मृत्यू झाला.
त्या दु:खातून जेमतेम सावरल्यानंतर पुन्हा पती-पत्नीत वितुष्ट निर्माण झाले. वाद इतका टोकाला गेला की पत्नीने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. चार दिवसापूर्वीच दोघांचा घटस्फोट झाल्याचे मनोजच्या नातेवाईकांनी सांगितले, तर काहींनी घटस्फोटाची नोटीस मिळाल्याचे सांगितले, त्यामुळे याबाबत वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकली नाही.
जग पाहण्याआधीच मुलाचा मृत्यू, त्यातच पत्नीने घेतलेला घटस्फोटाचा निर्णय यामुळे मनोज हा कमालीचा खचला होता. सतत तणावात राहत होता. उपअधीक्षकांकडे असलेल्या एका अर्जाच्या चौकशीचाही परिणाम मनोजच्या चेहर्‍यावर जाणवत होता. चौकशी आटोपून घरी जात असताना अपघातात ठार झाल्याचा निरोप नियंत्रण कक्षात आला. सहायक निरीक्षक राहुल वाघ यांनी नियंत्रण कक्ष अधिकारी अजय खर्डे यांना हा निरोप कळविला. त्यानंतर पोलीस दलातच सन्नाटा पसरला.
मनोज हा अतिशय प्रेमळ व जीवाला जीव लावणारा मुलगा होता, असे त्याचे सहकारी मित्र गिरीश बोरसे व हरुन पिंजारी यांनी सांगितले. त्याच्या सहकार्‍यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. आई व मामांचा आक्रोश तर मन हेलावणारा ठरला.