शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

मनोज आणि रमेश जयस्वाल कोळसा घोटाळ्यात दोषी; एआयपीएल कंपनीविरोधात कोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 06:24 IST

एआयपीएल कंपनीने खोटी माहिती सादर करून कोळसा ब्लॉक मिळविले असा सीबीआयने आरोप केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वृंदा, सिसाई, मेरल येथील कोळसा ब्लॉकच्या वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नागपूर येथील अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे (एआयपीएल) व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार जयस्वाल आणि माजी संचालक रमेश कुमार जयस्वाल यांना सीबीआय विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले.

एआयपीएल कंपनीने खोटी माहिती सादर करून कोळसा ब्लॉक मिळविले असा सीबीआयने आरोप केला होता. २०१६ साली हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. कोळसा खाणींतील ब्लॉक कोणाला द्यावे यासाठी केंद्रीय पोलाद खात्याची शिफारस महत्त्वाची असते. या खात्याला सदर कंपनीने बनावट कागदपत्रे सादर केली होती असा सीबीआयचा आरोप आहे. मनोज  व रमेश कुमार जयस्वाल यांना फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि बनावट कागदपत्रे हे खरे दस्तऐवज असल्याचे भासविणे या गैरकृत्यांबद्दल दोषी ठरवण्यात आले. त्यांना न्यायालय लवकरच शिक्षा सुनावणार आहे.

झारखंड येथील हजारीबाग येथे खासगी जमिनीची केलेली खरेदी, प्रस्तावित प्रकल्पासाठी यंत्रसामग्री विकत घेणे, कोळसा खाणींतील ब्लॉक मिळवण्यासाठी बँकांशी केलेला आर्थिक करार यासंबंधीची बनावट कागदपत्रे सरकार दरबारी सादर करण्यात आली, असे तपास यंत्रणेने चार वर्षे केलेल्या चौकशीत दिसून आले. पोलाद मंत्रालयाच्या शिफारशीनंतर एआयपीएलला वृंदा, सिसाई आणि मेरल कोळसा खाणींमधील ब्लॉकचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी मनोज कुमार जयस्वाल यांचे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण होते असे निरीक्षण न्यायाधीशांनी नमूद केले. ही कागदपत्रे रमेश कुमार जयस्वाल यांच्यामार्फत केंद्र सरकारला देण्यात आली होती.

फिर्यादी पक्षाने तपासले ३८ साक्षीदारया गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने ६ जानेवारी २०१६ रोजी गुन्हा नोंदविला होता व २९ ऑक्टोबर २०२० रोजी आरोपपत्र दाखल केले होते. फिर्यादी पक्षाने ३८ साक्षीदार तपासले आणि ७४ कागदपत्रे सादर केली. न्यायालयात सीबीआयतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ आर. एस. चीमा आणि वकील संजय कुमार आणि तरन्नुम चीमा यांनी काम पाहिले.

टॅग्स :Coal Allocation Scamकोळसा खाण घोटाळा