चंदीगड : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या शिक्षकी पेशात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. पंजाब विद्यापीठामध्ये ५० वर्षांपूर्वी त्यांनी आपले शेवटचे व्याख्यान दिले होते. विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अध्यासनातर्फे देण्यात आलेला प्राध्यापकपदाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आहे.आपल्या चंदीगड भेटीत ते व्याख्यान देण्याची शक्यता आहे. तसेच चंदीगड बाहेर असताना ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, असे कुलगुरू ग्रोव्हर यांनी सांगितले.
मनमोहन सिंग पुन्हा शिकविणार
By admin | Updated: April 14, 2016 01:20 IST