शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Manipur: तिघांची गोळ्या घालून हत्या, मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना; राज्य अशांत क्षेत्र घोषित करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 07:00 IST

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी तीन जणांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

इंफाळ - मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी तीन जणांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. कांगगुई भागातील इरेंग आणि करम वैफेई गावांदरम्यान सकाळी घटना घडली. कांगपोकपी येथील ‘कमिटी ऑन ट्रायबल युनिटी’ने या संघटनेने हल्ल्याचा निषेध केला आहे.

मणिपूरमधील सामान्य स्थिती पूर्ववत करण्याबाबत केलेल्या आपल्या आवाहनाबाबत केंद्र सरकार गंभीर असेल, तर त्यांनी ताबडतोब खोऱ्यातील सर्व जिल्हे अशांत क्षेत्र म्हणून घोषित करावे आणि राज्यात सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, १९५८ लागू करावा, अशी मागणी सीओटीयूने एका निवेदनाद्वारे केली आहे.  ८ सप्टेंबर रोजीही तेंगनौपाल जिल्ह्यातील पल्लेल भागात उसळलेल्या हिंसाचारात तीन ठार तर ५० हून अधिक जखमी झाले होते. 

अखंडतेच्या रक्षणासाठी आमदारांचा संकल्पभाजपच्या २३ आमदारांनी राज्याच्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणाचा संकल्प  असलेल्या ठरावावर स्वाक्षरी केली. राज्यातील सध्याचे संकट दूर करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाचे मन वळवण्यासाठी लवकरात लवकर दिल्लीला जाण्याचे आश्वासनही आमदारांनी दिले. 

भाजप-टिपरा मोथा कार्यकर्त्यांत संघर्षआगरतळा : त्रिपुराच्या सिपाहिजाला जिल्ह्यात विजयी रॅलीवरून सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष टिपरा मोथाच्या कार्यकर्त्यांत सोमवारी राडा झाला. यात एक पोलिस अधिकारी व अन्य दोन कर्मचाऱ्यांसह १२जण जखमी झाले. रॅलीत सहभागी होण्यापासून रोखल्याने हा संघर्ष झाला.

प्राध्यापकाला मिळाले संरक्षण- सर्वोच्च न्यायालयाने एक निवृत्त कर्नल आणि प्राध्यापकाला कठोर कारवाईपासून संरक्षण दिले. मणिपूर पोलिसांनी जानेवारी २०२२ मध्ये प्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून कर्नलविरुद्ध, तर जाहीर भाषणातील वक्तव्यांवरून प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. - खंडपीठाने सांगितले की,  आम्ही तुम्हाला मणिपूर हिंसाचार प्रकरणात तुमच्या बाजूने कोणताही वकील हजर राहण्यास तयार नाही, असे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगत आहोत. सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार