शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जाहीरनाम्याचाच विसर पडला अन् सर्व विरोधकांची अशी झाली फजिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 06:53 IST

विरोधकांचा आवाज बंद : जॉर्ज फर्नांडिस यांनी अखेर ‘सोर्स’ केला उघड

- अजित गोगटे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसने व भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राजकीय पक्ष मोठ्या धुमधडाक्यात जाहीरनामे प्रसिद्ध करत असले तरी सत्तेवर येणाऱ्या पक्षांना त्यांचा नंतर हमखास विसर पडतो. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी या जाहीरनाम्यांचा कितपत उपयोग होतो, हाही संशोधनाच विषय ठरावा. पण ज्या पक्षाने जाहीरनामा काढला होता त्यालाच त्याचा विसर पडल्याने संसदेत त्यांच्या नेत्याची फजिती झाल्याचा किस्सा मासलेदार आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ‘रालोआ’ने दुसरे सरकार २० मार्च १९९८ रोजी बनवले. त्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर २८ मार्च रोजी लोकसभेत चर्चा सुरू होती. काँग्रेस व डाव्यांसह सर्व विरोधी पक्ष सरकार पाडण्यासाठी एकवटले होते.सरकारतर्फे मंत्री जॉर्ज फर्नांडिस बोलायला उभे राहिले. हातातील कागदांमध्ये पाहून जॉर्ज यांनी काँग्रेसवर तोफ डागायला सुरुवात केली. त्यांना अडथळे आणण्यात काँग्रेस व माकपचे सदस्य हिरीरीने सहभागी झाले. त्यांचा विरोध न जुमानता फर्नांडिस बोलतच राहिले. काँग्रेसविषयीचे हे आरोप फर्नांडिस कशाच्या आधारे करत आहेत ते उघड केल्याखेरीज त्यांना बोलू देऊ नका, असा विरोधकांचा आक्षेपाचा मुद्दा होता. लोकसभा अध्यक्ष सी.एम. बालयोगी यांनी विनंती करूनही गोंधळ थांबेना.

शेवटी जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या मिश्किल शैलीत ‘सोर्स’ उघड केला व आपण काँग्रेसविषयी जे काही बोललो ते माकपच्या जाहीरनाम्यातील उतारे होते, असे जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेल्या पण वाजपेयी सरकार पाडण्यासाठी एकत्र आलेल्या कम्युनिस्ट व काँग्रेस सदस्यांचे चेहरे ओशाळे झाले. त्यांचा गोंधळ बंद झाला. महिनाभरापूर्वीच्या जाहीरनाम्यात आपण काय लिहिले होते याचा मार्क्सवाद्यांना विसर पडला होता!त्या दिवशी वाजपेयी सरकार २७४ विरुद्ध २६१ मतांनी तरले. परंतु तेरा महिन्यांनी विरोधी पक्षांनी पुन्हा एकजूट करून वाजपेयी सरकारला घेरले. यावेळी विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव अवघ्या एका मताने मंजूर झाला व वाजपेयी यांचे हे दुसरे सरकारही अल्पजीवी ठरले. त्याआधी १९९६ मध्ये त्यांचे सरकार अवघे १३ दिवस टिकले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी