शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खरिपावर मका-सोयाबीनची छाप, बाजरीचे क्षेत्र लाखाने घटले

By admin | Updated: July 13, 2017 23:53 IST

पावसाने ओढ दिल्याने रखडल्या पेरण्या

पावसाने ओढ दिल्याने रखडल्या पेरण्यागणेश धुरीलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : खरीप हंगामात चालू वर्षात खरीप बाजरीचे क्षेत्र कमालीचे घटले असून, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. बाजरीचे ७५ हजार ते एक लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र घटून, त्याऐवजी मका पिकाचे ५० हजारावरून वाढत वाढत यावर्षी चक्क पावणेदोन लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र पोहोचले आहे. खरिपाच्या एकूण लागवडीतही सर्वाधिक पेरण्या मका पिकाच्या पेरण्या ८६ टक्के तर सोयाबीनच्या पेरण्या ६३ टक्के क्षेत्रावर झाल्या आहेत.११ जुलै अखेर खरीप हंगामाच्या ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ६३ हजार ५६८ हेक्टर ( ४७.४४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. भात पिकाचे खरिपाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६६ हजार ७०० असताना, प्रत्यक्षात १८ हजार ७२२ (२८ टक्के) हेक्टर क्षेत्रावर, ज्वारीचे ३९०० हेक्टर क्षेत्रापैकी १४५ हेक्टर (३.६३), बाजरी १ लाख ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार ८५२ हेक्टर ( ४७.३४), नागलीचे ३५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ७०२ हेेक्टर (१३.३०) मका पिकाचे १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात १ लाख ५० हजार ३१३ (८६. ८७) हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप तुरीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १० हजार ४०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ५ हजार २०१ (४९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडीद पिकाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ७ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रावर (५१ टक्के) भुईमूग पिकाचे ३१ हजार ३०० हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असताना प्रत्यक्षात १५ हजार ५७४ हेक्टर (१५१ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाचे सरासरी लागवडीखालील ५७ हजार हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ३६ हजार १६५ हेक्टर ( ६३.४३ टक्के) क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. जूनमध्ये दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अजून आठवडाभर पाऊस झाला नाही, तर काही भागात दुबार पेरण्या करण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक बाजरीचे अडीच ते पावणेतीन लाख हेक्टरचे क्षेत्र दीड लाखापर्यंत खाली आले आहे.