शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सात एकर जमिनीचे मालक होणार; 100 वर्षे पूर्ण झालेली 'आई' नावावर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 12:57 IST

१०० वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात राहणाऱ्या १०० वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १०० वर्षीय आजीबाई पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची स्तुती करताना दिसत आहे. खरं तर संबंधित महिला २५ बिघा जमीन मोदींना देणार असल्याचे सांगत आहे. म्हणजेच पंतप्रधान मोदींना सात एकर जमीन देणार असल्याचे आजीबाईंनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात १ बिघा म्हणजे ०.२७ एकर आहे.

मध्य प्रदेशातील हरिपुरा जागीर गावात ही वृद्ध महिला राहते. मांगीबाईं असे या आजीबाईंचे नाव असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने खूप प्रभावित झाल्या आहेत. "मोदी माझा मुलगा आहे, आम्हाला गहू-तांदूळ, खत-बियाणे दिले आहे. तो आमच्यावर उपचार करत आहे. पीक वाया गेल्यास नुकसान भरपाई देतो. तीर्थयात्रेला देखील नेले. कॉलनीत राहण्यासाठी घर दिले. मला विधवा पेन्शन चालू केली", अशा शब्दांत आजीबाईंनी पंतप्रधानांचे कौतुक केले.

PM मोदींना भेटायचे आहे - मांगीबाईमांगीबाईंनी सांगितले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधीच परस्पर भेटली नाही, पण टीव्हीवर अनेकदा पाहिले आहे. मला माझ्या मुलाला म्हणजेच मोदीला भेटायचे आहे. मला त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचा आहे. मला पंतप्रधान मोदींना एवढेच सांगायचे आहे की, पेन्शन आणखी थोडी वाढवावी."

२५ बिघा जमीन मोदींनाच देणार मांगीबाईंच्या म्हणण्यानुसार, त्यांना एकूण १४ मुले असून १२ मुली आणि दोन मुलगे आहेत. पण सर्वात आवडता मुलगा पंतप्रधान मोदी आहेत. त्यांच्यामुळेच त्यांची इतर १४ मुले काम करत आहेत. त्यांनी घराच्या भिंतीवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे. तसेच माझी २५ बिघे जमीन मोदींनाच देईन, कारण ते आपल्या सर्वांची काळजी घेत आहेत, असा मानस १०० वर्षीय आजीबाईंचा आहे, 

"मी माझ्या मुलांना फक्त पंतप्रधान मोदींनाच मतदान करायला सांगते. पंतप्रधान मोदींनी आम्हा सर्वांना कोरोनापासून वाचवले. लोकांचे भले करताना माझा मुलगा वृद्ध झाला आहे", असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानSocial Viralसोशल व्हायरल