शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

इंदिरा गांधींचा कल मनेका यांच्याकडे होता!

By admin | Updated: May 13, 2016 07:41 IST

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती.

नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती. परंतु मनेका गांधी त्या वेळी राजीव गांधी यांच्या विरोधकांच्या गोतावळ्यात अडकल्या होत्या. अर्थात इंदिराजींना सोनियांबद्दल जिव्हाळा होता. पण संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांना मनेकांबद्दल जास्त आपुलकी वाटायला लागली होती. इंदिरा गांधींचे खासगी आरोग्य चिकित्सक के.पी. माथुर यांनी ‘द अनसीन इंदिरा गांधी’ या त्यांच्या पुस्तकात उपरोक्त दावा केला आहे. सफदरजंग इस्पितळातील माजी डॉक्टर माथुर हे जवळपास २० वर्षे इंदिराजींचे डॉक्टर होते. ते दररोज सकाळी इंदिराजींना भेटत असत आणि १९८४ साली इंदिराजींच्या निधनापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. या काळातील इंदिराजींसोबतचे आपले अनुभव त्यांनी या पुस्तकातून शब्दबद्ध केले आहेत. इंदिराजींचे हे प्रेम, जिव्हाळा मनेका यांना त्यांच्याजवळ आणू शकला नाही. सोनिया सर्वसाधारणपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असत आणि राजकीय मुद्द्यांवर मात्र मनेका यांचे मत माजी पंतप्रधान लक्षात घेत. मनेका यांना राजकारणाची चांगली समज होती. पण संजय गांधी यांच्या निधनानंतर काही वर्षांतच मनेका यांनी परिस्थितीशी जुळवून न घेता पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले, असेही या पुस्तकात नमूद आहे. डॉ. माथुर यांच्या सांगण्यानुसार, मनेका नेहमीच राजीव गांधी यांच्या विरोधकांसोबत राहिल्या. यातूनच संजय विचार मंच उदयास आला होता. परंतु मनेका आणि त्यांचे राजीवविरोधी सहकारी या मंचच्या माध्यमाने नेमके काय काम करीत होते हे त्यांना कधीच कळले नाही. संजय विचार मंचच्या लखनौमध्ये झालेल्या संमेलनाचाही या पुस्तकात उल्लेख आहे. इंदिरा गांधी त्या वेळी विदेश दौऱ्यावर होत्या. तेथून त्यांनी मनेका यांना या संमेलनाला मार्गदर्शन न करण्याचा सल्लाही दिला होता. परंतु मनेका यांनी त्यांची सूचना धुडकावून संमेलनात भाषण दिले होते. >पुस्तकानुसार राजीव-सोनिया यांच्या लग्नानंतर सासू-सुनेदरम्यान सामंजस्य होते. सोनिया गांधी आपल्या सासूबार्इंचा आदर करायच्या. अत्यल्प कालावधीतच त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. वाचनाची आवड असलेल्या इंदिराजी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी पुस्तके वाचत असत. >1966 साली पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर इंदिरा गांधींची सुरुवातीच्या काळातील तणाव, पोखरण चाचणीनंतरची मन:स्थिती, आणीबाणीचा काळ आदी महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना इंदिरा गांधींची नात प्रियंका वाड्रा यांनी लिहिली आहे.