पिलीभीत : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप नेते वारंवार काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडत असतात. पण भाजपच्या नेत्या व केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी मात्र भ्रष्टाचाराला आळा कसा घालावा, हे सोनिया गांधींकडून शिकायला पाहिजे, असा सल्ला आपल्याच पक्ष कार्यकर्त्यांना दिला. जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या मनेका यांनी वरील विधान केले. त्यांच्यासमोर काही अधिकारी पैसे घेऊन अनधिकृत शाळांना वर्ग चालवण्याची परवानगी देतात. मात्र, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे हक्क आम्हाला नाहीत, अशी तक्रार सरकारी अधिकाऱ्याने केली. त्यावर मनेका यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोनिया यांचे उदाहरण दिले. मनेका म्हणाल्या की, सोनिया यांच्या नातेवाईकाने दुकान उघडले आणि आपण सोनियांचे नातेवाईक असल्याचे सांगून त्याने दुकानाची जाहिरात करण्यास सुरुवात केली. सोनिया यांना हे समजताच त्यांनी वृत्रपत्रात जाहिरात देऊन त्या दुकानात जाऊ नका, असे लोकांना सांगितले होते. (वृत्तसंस्था)असे मनेका म्हणाल्या. त्याचप्रमाणे तुम्हीही अशी जाहिरात प्रसिद्ध करा आणि ज्यांना शाळेला मान्यता हवी, त्यांना थेट तुमच्याशी संपर्क साधायला सांगा, तुमच्या कार्यालयाबाहेरही तशी नोटीस लावा, असा सल्ला मनेका मांधी यांनी दिला. शिवाय संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
मनेका गांधींनी केली सोनिया गांधींची स्तुती
By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST