शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतील मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; मदरसा शिक्षण मंडळाकडून आदेश जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 06:25 IST

२४ मार्च रोजी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या सर्व मदरशांमध्ये दररोज राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस. एन. पांडे यांनी मागील ९ मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी केले होते.

आदेशात म्हटले आहे की, २४ मार्च रोजी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. राज्यात रमजान महिन्याच्या कालावधीत मदरशांना ३० मार्च ते ११ मेपर्यंत सुटी जाहीर झालेली होती. १२ मेपासून नियमित वर्ग सुरू होतील. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हे आदेश लागू करण्यात आले.

आदेशात म्हटले आहे की, सर्व मान्यताप्राप्त अनुदानित व गैरअनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून वर्ग सुरू होण्यापूर्वी अन्य प्रार्थनांसमवेत शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनींना राष्ट्रगीत गायन अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित रूपाने देखरेख करावी लागेल.

शिक्षक संघ मदारिक अरबियाचे सरचिटणीस दिवान साहब जमां खान यांनी सांगितले की, मदरशांमध्ये आजवर वर्ग सुरू होण्यापूर्वी हम्द व सलाम होत आहे. काही ठिकाणी राष्ट्रगीत होत होते. परंतु, ते अनिवार्य नव्हते. आता ते अनिवार्य करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था) 

१६,४६१ मदरशेराज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री धर्मपाल सिंह यांनी मागील काही महिन्यांपासून मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे शिक्षण देण्यावर भर दिला होता. राज्यमंत्री दानिश आजाद अन्सारी यांनीही म्हटले होते की, मदरशांमधील विद्यार्थी देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत व्हावेत, अशी सरकारची इच्छा आहे. उत्तर प्रदेशात सध्या १६,४६१ मदरशे आहेत. त्यापैकी ५६० मदरशांना सरकारचे अनुदान प्राप्त आहे.